अकोला - जिल्ह्यात आज सायंकाळी 11 तर सकाळी 54 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे, पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 18 बंदिवानांचा समावेश आहे. तर सकाळी तिघांचा आणि दुपारी एकाचा असे दिवसभरात 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
सायंकाळी प्राप्त झालेल्या 11 पॉझिटिव्ह अहवालांमध्ये 6 महिला व 5 पुरुषांचा समावेश आहे. ते खदान, शौकतअली चौक, आदर्श कॉलनी, आळशी प्लॉट, देशमुख फैल, लकडगंज, जुना तारफैल, बोरगाव मंजू, शंकरनगर, बार्शी टाकळी आणि वाशिम येथील रहिवासी आहेत.
आज दुपारी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती बाळापूर येथील 43 वर्षीय पुरुष असून ते 9 जून रोजी दाखल झाले होते. त्यांचा आज दुपारी उपचार घेताना मृत्यू झाला. दरम्यान, आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 28 जणांना घरी सोडण्यात आले. तर कोविड केअर सेंटरमधून 45 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालांबाबत माहिती
प्राप्त अहवाल-310
पॉझिटिव्ह अहवाल-65
निगेटिव्ह-245
सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- 1 हजार 309
मृत्यू- 71
डिस्चार्ज- 905
दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- 333