मुंबई - राज्यात रविवारी कोरोनातून बरे झाल्यामुळे १६३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ९७८ झाली इतकी आहे. राज्यात रविवारी एका दिवसात कोरोनाच्या ३३९० नवीन रुग्णांचे निदान झाले. तर सध्या राज्यात ५३ हजार १७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राजेश टोपे यांनी सांगितले की, राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा करोनाच्या निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ५७ हजार ७३९ नमुन्यांपैकी १ लाख ७ हजार ९५८ नमुने हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ८७ हजार ५९६ लोक गृह विलगीकरणात आहेत. तर १५३५ जण संस्थात्मक विलगिकरण सुविधांमध्ये ७७ हजार १८९ खाटा उपलब्ध आहेत.
सध्या २९ हजार ६४१ लोक संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत. राज्यात १२० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू हे ठाणे- ८० (मुंबई ६९, ठाणे ४, उल्हासनगर ५, पालघर १, वसई-विरार १), पुणे- १४ (पुणे ११, सोलापूर ३), नाशिक -१४ (नाशिक ३,जळगाव ११), कोल्हापूर-१ (रत्नागिरी १), औरंगाबाद-७ (औरंगाबाद ७), लातूर -२ (उस्मानाबाद २), अकोला-२ (अकोला २) इतके आहेत.
रविवारी एकाच दिवसात ८१ पुरुष तर ३९ महिलांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या १२० मृत्यूंपैकी ६०वर्षे किंवा त्यावरील ६६ रुग्ण आहेत तर ४० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १४ जण ४० वर्षांखालील आहे. या १२० रुग्णांपैकी ८० जणांमध्ये ( ६७ टक्के) मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या आता ३९५० झाली आहे.
रविवारी नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ४३ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २ जून ते ११ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७७ मृत्यूंपैकी मुंबई ५८,जळगाव – ८, नाशिक -३, ठाणे -३, उल्हासनगर -३, रत्नागिरी -१ , पुणे १ मृत्यू असे आहेत.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
*मुंबई महानगरपालिका:* बाधीत रुग्ण- (५८,२२६), बरे झालेले रुग्ण- (२६,९८६), मृत्यू- (२१८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९,०५०)
*ठाणे:* बाधीत रुग्ण- (१८,०८०), बरे झालेले रुग्ण- (६८७१), मृत्यू- (४३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०,७७४)
*पालघर:* बाधीत रुग्ण- (२३२६), बरे झालेले रुग्ण- (७१४), मृत्यू- (५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५६२)
*रायगड:* बाधीत रुग्ण- (१८६८), बरे झालेले रुग्ण- (११६३), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (६३९)
*नाशिक:* बाधीत रुग्ण- (१९३४), बरे झालेले रुग्ण- (११७८), मृत्यू- (१०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६५१)
*अहमदनगर:* बाधीत रुग्ण- (२३९), बरे झालेले रुग्ण- (१६६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४)
*धुळे:* बाधीत रुग्ण- (३९३), बरे झालेले रुग्ण- (२२३), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४३)
*जळगाव:* बाधीत रुग्ण- (१७०२), बरे झालेले रुग्ण- (६६८), मृत्यू- (१३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९०३)
*नंदूरबार:* बाधीत रुग्ण- (४८), बरे झालेले रुग्ण- (३०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४)
*पुणे:* बाधीत रुग्ण- (१२,१८४), बरे झालेले रुग्ण- (६७५०), मृत्यू- (४८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९५४)
*सोलापूर:* बाधीत रुग्ण- (१८२०), बरे झालेले रुग्ण- (६७६), मृत्यू- (१३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०१३)
*सातारा:* बाधीत रुग्ण- (७४१), बरे झालेले रुग्ण- (४३६), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७७)
*कोल्हापूर:* बाधीत रुग्ण- (६९४), बरे झालेले रुग्ण- (५३२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५४)
*सांगली:* बाधीत रुग्ण- (२२५), बरे झालेले रुग्ण- (१२०), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९८)
*सिंधुदुर्ग:* बाधीत रुग्ण- (१५०), बरे झालेले रुग्ण- (७८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७२)
*रत्नागिरी:* बाधीत रुग्ण- (३९२), बरे झालेले रुग्ण- (२७६), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१००)
*औरंगाबाद:* बाधीत रुग्ण- (२६६८), बरे झालेले रुग्ण- (१४५५), मृत्यू- (१३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०७८)
*जालना:* बाधीत रुग्ण- (२७२), बरे झालेले रुग्ण- (१५९), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०७)
*हिंगोली:* बाधीत रुग्ण- (२३९), बरे झालेले रुग्ण- (१८७), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१)
*परभणी:* बाधीत रुग्ण- (८२), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०)
*लातूर:* बाधीत रुग्ण- (१७६), बरे झालेले रुग्ण- (१२०), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८)
*उस्मानाबाद:* बाधीत रुग्ण- (१४६), बरे झालेले रुग्ण- (११३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८)
*बीड:* बाधीत रुग्ण- (७५), बरे झालेले रुग्ण- (४९), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२४)
*नांदेड:* बाधीत रुग्ण- (२३५), बरे झालेले रुग्ण (१५१), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४)
*अकोला:* बाधीत रुग्ण- (१०२१), बरे झालेले रुग्ण- (५६८), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१०)
*अमरावती:* बाधीत रुग्ण- (३४४), बरे झालेले रुग्ण- (२४३), मृत्यू- (२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८०)
*यवतमाळ:* बाधीत रुग्ण- (१८१), बरे झालेले रुग्ण- (१३६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२)
*बुलढाणा:* बाधीत रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (७३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९)
*वाशिम:* बाधीत रुग्ण- (४९), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४१)
*नागपूर:* बाधीत रुग्ण- (१०१३), बरे झालेले रुग्ण- (५९८), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०३)
*वर्धा:* बाधीत रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५)
*भंडारा:* बाधीत रुग्ण- (४९), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८)
*गोंदिया:* बाधीत रुग्ण- (७०), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१)
*चंद्रपूर:* बाधीत रुग्ण- (४७), बरे झालेले रुग्ण- (२७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०)
*गडचिरोली:* बाधीत रुग्ण- (४९), बरे झालेले रुग्ण- (३९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९)
*इतर राज्ये:* बाधीत रुग्ण- (८१), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६१)
*एकूण: बाधीत रुग्ण-(१,०,७९५८), बरे झालेले रुग्ण- (५०,९७८), मृत्यू- (३९५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१३),ॲक्टीव्ह रुग्ण-(५३,०१७)*
आयसीएमआरच्या पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या १३५ रुग्णांचा आणि ठाणे जिल्ह्यातील १४० रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर .पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.