सोलापूर- राज्यातील शहरांमध्ये कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. त्याचप्रमाणे पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज 50 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली असून प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहे.
आज कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 50 जणांमध्ये ग्रामीण भागातील 18 तर शहरातील 32 नवे रुग्ण आहेत. ग्रामीण भागातील 18 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी लक्ष्मी टाकळी येथील 15, खेडभोसे येथील 1, तारापूर येथील 1 तर भटुबरे येथील एका जणाचा समावेश आहे.
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 163 झाली आहे. दरम्यान, आज सकाळी 7 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना आज डिस्जार्च देण्यात आला आहे. बरे होणाऱ्यांची संख्या 46 आहे, तर पंढरीत कोरोनाची एकूण संख्या 211 इतकी झाली आहे.
दरम्यान, पंढरपूर शहर आणि तालुक्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 211 इतकी झाली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 163 इतकी आहे. त्यात शहरातील 149 आणि तालुक्यातील 55 रुग्ण आहेत. दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.