मुंबई - मुंबईत लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यामुळे लसीचा सातत्याने तुटवडा जाणवत आहे. दिड लाख लसीचा साठा आल्याने आज पुन्हा जवळपास सर्वच लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू झाले. दिवसभरात आज 45 हजार 326 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत एकूण 22 लाख 82 हजार 609 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत सोमवारी 45 हजार 326 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 19 हजार 795 लाभार्थ्यांना पहिला तर 25 हजार 531 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 22 लाख 82 हजार 609 लाभार्थ्यांना लस देण्यात आली त्यात 18 लाख 89 हजार 371 लाभार्थ्यांना पहिला तर 3 लाख 93 हजार 238 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 77 हजार 096 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 17 हजार 341 फ्रंटलाईन वर्कर, 8 लाख 95 हजार 455 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 7 लाख 92 हजार 717 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
लसीचा साठा उपलब्ध -
मुंबईत रोज 30 ते 50 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केले जात आहे. यामुळे लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. लसीचा तुटवडा असल्याने 132 पैकी बहुतेक केंद्र बंद ठेवावी लागते आहेत. काल 1 लाख 58 हजार लसीचा साठा महापालिकेकडे उपलब्ध झाला आहे. यामुळे पुढील तीन दिवस लसीकरण मोहीम सुरू राहील, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
लसीकरण मोहीम -
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे.
एकूण लसीकरण -
आरोग्य कर्मचारी - 2,77,096
फ्रंटलाईन वर्कर - 3,17,341
जेष्ठ नागरिक - 8,95,455
45 ते 59 वय - 7,92,717
एकूण - 22,82,609