नवी दिल्ली - राज्यसभेच्या 61 पैकी 45 नवनियुक्त सदस्यांनी आज(बुधवार) खासदारपदाची शपथ घेतली. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत शरद पवार, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि भाजपचे भूवनेश्वर कालित या नेत्यांनी खासदार पदाची शपथ घेतली. कोरोनामुळे नियमांचे पालन करत शपथविधी पार पडला.
राज्यसभेचे सत्र सुरु नसताना पहिल्यांदाच शपथविधी कार्यक्रम पार पडला. जे सदस्य उपस्थितीत नव्हते त्यांना नंतर शपथ देण्यात येणार आहे. राज्यसभा अध्यक्ष ए. व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत सदस्यांना शपथ देण्यात आली. एकाच अतिथीला आणण्याची परवानगी सदस्यांना देण्यात आली होती.
कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर शपथविधी पुढे ढकलण्यात आला होता. जून महिन्यात राज्यसभेतील रिक्त जागांसाठी मतदान घेण्यात आले. पहिल्यांदाचा शपथ घेणाऱ्यामध्ये प्रियंका चतुर्वेदी, ज्यांनी मागील वर्षी काँग्रेस पक्ष साडून शिवसेनेत प्रवेश केला. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस नेते शक्तिसिंह गोहिल यांचा समावेश आहे.