नाशिक- दिंडोरी तालुक्यात गेल्या 10 दिवसांपासून सातत्याने रुग्ण वाढत असून आज पुन्हा 4 कोरोना रुग्ण वाढल्याने तालुक्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 15 वर पोहोचली आहे. सर्व रुग्णांचा नाशिकशी संपर्क असल्याने तालुक्यातील धोका वाढत चालला असून नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
आज नव्याने सापडलेल्या 4 रुग्णांमध्ये मोहाडी येथील रुग्णाच्या संपर्कातील 1 तसेच परमोरी, खेडगाव व जवळके दिंडोरी येथील रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने सर्व रुग्णांच्या संपर्कातील अती जोखमीच्या व्यक्तींना कोविड केअर सेंटरमध्ये हलवले असून सर्वांचे स्वॅब तपासणीला पाठवले आहे.
सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी. लहान मुले, जेष्ठ नागरिक तसेच विविध व्याधी असलेले नागरिक यांना सदर संसर्गाचा अती धोका आहे, तरी सर्वांनी काळजी घ्यावी. सरकारने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर तहसीलदार कैलास पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी सुजित कोशिरे, अधीक्षक डॉ. विलास पाटील यांनी केले आहे.