ETV Bharat / briefs

नांदेड जिल्हा प्रशासनाच्या ताफ्यात 4 बोटींचा समावेश; अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर ठेवणार नजर - 4 new boats Nanded district administration

4 बोटींपैकी 2 बोटी या नांदेड शहरासाठी, तर एक बोट हदगाव तहसील व एक बोट नायगाव तहसीलकडे सुपूर्द केली जाणार आहे.

Boats Nanded district administration
Boats Nanded district administration
author img

By

Published : Jul 4, 2020, 10:22 PM IST

नांदेड- जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थिती व नदीतील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने 4 नवीन बोटींची इतर अत्यावश्यक साधनांसह खरेदी केली आहे. आज तांत्रिक समितीद्वारे तपासणी करून घेतल्यानंतर बोटींना जिल्हा प्रशासनाच्या ताफ्यात सहभागी करून घेण्यात आले असून जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी या बोटींची पाहणी केली.

4 बोटींपैकी 2 बोटी या नांदेड शहरासाठी, तर एक बोट हदगाव तहसील व एक बोट नायगाव तेहसीलकडे सुपूर्द केली जाणार आहे. याचबरोबर या बोटीसमवेतच प्रत्येक तालुक्याला लाईफ जॅकेट, लाईफ बॉय, सॉ कटर, रेस्क्यू रोप, मेगा फोन, फर्स्ट एड किट, फोल्डेबल स्ट्रेचर, टूल किट इत्यादी शोध व बचाव साहित्य दिले जाणर आहे.

प्रत्येक तहसील कार्यालयातील 2 कर्मचारी याप्रमाणे बोट चालविण्याचे प्रशिक्षण मास्टर ट्रेनरद्वारे दिले जाणार आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, नांदेडचे तहसीलदार सारंग चव्हाण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, अग्निशमन अधिकारी रईस पाशा आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.