भद्राद्री कोतागुडेम - तेलंगणातील भद्राद्री कोतागुडेम येथील जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील दत्त यांनी सोमवारी ४० माओवादी गावांमध्ये फिरत असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या विचारसरणीचा प्रचाराचे काम ते करत असल्याचे दत्त यांनी सांगितले.
'काराकागुडेम, इदुल्ला बय्याराम, गुंडाला, मणुगुरु या गावांमध्ये ४० माओवादी जमिनीविषयी दुर्भावनायुक्त विचारसरणीचा प्रचार करत आहेत. हरीभूषण, दामोदर, लच्छाण्णा, रीना, राजीरेड्डी ऊर्फ वेंकाण्णा, भद्रू, मंगू, मंगलू हे त्यांचे नेतृत्व करत आहेत,' असे दत्त यांनी सांगितले आहे. 'राज्य पोलिसांनी या माओवाद्यांना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. यासाठी ३ हजार पोलीस काम करत आहेत.
साधारण एका आठवड्यापासून या भागात माओवाद्यांविषयी भिंतींवर पत्रके आणि त्यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. जे लोक त्यांच्याविषयी इत्थंभूत माहिती देतील, त्यांना रोख ५ लाखांचे बक्षीस देण्यात येईल. तसेच, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे दत्त यांनी म्हटले आहे.