पालघर - संपूर्ण वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोरोनाने थैमान घातला आहे. तसेच दिवसाला सरासरी 150 ते 200 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. आज वसई-विरारमध्ये एका दिवसात 251 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
आज दिवसभरात कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. 121 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 251 रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 9 हजार 827 झाली आहे. वसई विरारमध्ये एकूण 189 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तसेच, पालिका क्षेत्रात आतापर्यंत 6 हजार 461 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 3 हजार 177 कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.