पुणे - जिल्ह्यात 24 गावे आणि 129 वाड्यावस्तीत 27 टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. जिल्ह्यातील 37 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना टँकरच्या पाण्याचा लाभ मिळत आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला असल्याने धरणे भरलेली होती. त्यामुळे पाण्याची टंचाई जाणवली नाही. मात्र, धरणातून शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या आवर्तनामुळे पाणलोट क्षेत्रात टंचाई सुरू झाली आहे. जिल्ह्यात टँकरची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेने कमी आहे. जिल्ह्यातील 18 खासगी विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मार्फत अधिग्रहित केल्या आहेत.
जिल्ह्यातील पाणीप्रश्न मिटवण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत सर्वाधिक रकमेचा टंचाई आराखड्याला मंजुरी दिली होती. त्याअंतर्गत तलाव खोदणे, विहिरी खोदणे गाळ उपसणे, नळपाणी पुरवठा योजना राबविणे, अशी अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. ती प्रगतीपथावर सुद्धा आहेत. मात्र, कोरोनाचे कारण देत कामाला विलंब होत असल्याचे ठेकेदार सांगत आहेत.
जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक टँकर (तालुका व टँकर ची संख्या)
आंबेगाव - 11, भोर - 01, हवेली - 02, खेड - 05, जुन्नर - 05 तर इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर, बारामती, दौंड, वेल्हा, मावळ या तालुक्यात एकही टँकर सुरू नसल्याची माहिती जिल्हा परिषदेने पत्रक काढून दिली. तालुक्यातील सुमारे 27 गावात टँकरने पाणी पुरवठा केला जात असून आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक 11 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील 37 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना टँकरच्या पाण्याचा लाभ मिळत आहे.
एकंदरीत राज्यकर्त्यांना पुरेशी पाण्याची व्यवस्था करता आलेली नाही. हा पाण्याचा प्रश्न कोण सोडविणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे