ETV Bharat / briefs

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या होत आहे कमी ; बुधवारी 166 जण आढळले बाधित, दोघांचा मृत्यू - Chandrapur corona update

बुधवारी गेल्या 24 तासात 166 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 179 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी जिल्ह्यातील 170, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 11 हजार 472 झाली आहे.

 166 people were found infected and two dead in chandrapur

author img

By

Published : Oct 8, 2020, 1:45 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे असे दिसून येत आहे. बुधवारी गेल्या 24 तासात 166 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 11 हजार 472 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 8 हजार 99 कोरोना बाधितांना बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 3 हजार 194 कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.

गेल्या 24 तासामध्ये जिल्ह्यात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. या मृतांमध्ये छोटा नागपूर परिसरातील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या महिलेला 6 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तर, दुसरा मृत्यू रामनगर येथील सिंधी कॉलनी परिसरातील 70 वर्षीय पुरुषाचा झाला आहे. या रुग्णाला 2 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. पहिल्या बाधिताला कोरोनासह श्वसनाचा आजार होता. तर, दुसऱ्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार होता.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 179 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 170, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात आढळलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 65, पोंभुर्णा तालुक्यातील दोन, बल्लारपूर तालुक्यातील 11, चिमूर तालुक्यातील 13, मुल तालुक्यातील 14, जिवती तालुक्यातील पाच, कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील पाच, नागभीड तालुक्‍यातील सहा, वरोरा तालुक्यातील आठ, भद्रावती तालुक्यातील 16, सावली तालुक्यातील पाच, सिंदेवाही तालुक्यातील चार, राजुरा तालुक्यातील 10 तर नागपूर येथील एक अशा एकूण 166 जणांचा समावेश आहे.

शहरात 'या' ठिकाणी आढळले बाधित -

चंद्रपूर शहरातील व परिसरातील दुर्गापुर, घुटकाळा वार्ड, विठ्ठल मंदिर वार्ड, हॉस्पिटल वार्ड, प्रगती नगर, विद्यानगर, तुकूम, गिरणार चौक परिसर, भिवापूर वार्ड, इंदिरानगर, जल नगर वार्ड, बाबूपेठ, सरकार नगर, पठाणपुरा वार्ड, घुग्घुस, द्वारका नगरी, ओमकार नगर, हनुमान नगर,भाना पेठ वार्ड, घंटाचौकी, बोर्डा, बापट नगर या भागातील नागरिकांचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहे.

ग्रामीण भागात आढळलेले बाधित -

बल्लारपूर तालुक्यातील रेल्वे वार्ड, विद्या नगर वार्ड, गौरक्षण वार्ड, साईबाबा वार्ड, बामणी परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. राजुरा तालुक्यातील पंचशील वार्ड, बामणवाडा, सोमनाथपूर वार्ड, मानोली, कढोली, म्हाडा कॉलनी परिसर, जवाहर नगर, सास्ती,धोपटाळा भागात रुग्ण आढळून आले.

वरोरा तालुक्यातील यात्रा वार्ड, आंबेडकर वार्ड, सलीम नगर, टेमुर्डा, गांधी वार्ड परिसरातही रुग्ण आढळले. ब्रह्मपुरी तालुक्यातील कहाली, चौगान, मालडोंगरी, विद्यानगर, परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.भद्रावती तालुक्यातील विस्लोन, जुना सुमठाणा, झिंगोजी वार्ड, सुरक्षा नगर, एकता नगर,किल्ला वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सावली तालुक्यातील अंतरगाव,व्याहाड तर सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही भागात तरनागभीड तालुक्यातील डोंगरगाव, पेंढरी, मोहाडी, वसुंधरा कॉलनी परिसर, चिमूर तालुक्यातील मोटेंगाव, नेताजी वार्ड, टिचर कॉलनी परिसर, राजीव गांधी नगर, नेहरू वार्ड, गुरुदेव नगर भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.तसेच मुल तालुक्यातील वार्ड क्रं. एक, हेकाडी, राजोली, ताडाळा परिसरातही रुग्ण आढळले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.