मुंबई - मुंबईत आज कोरोनाचे 1 हजार 498 नवे रुग्ण आढळून आले असून, 56 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 97 हजार 751 वर; तर मृतांचा आकडा 5 हजार 520 वर पोहोचला आहे.
मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्क्यांवर, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 52 दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 97 हजार 751 वर पोहोचला आहे तर मृतांचा आकडा 5 हजार 520 वर पोहोचला आहे. आज 707 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 68 हजार 537 वर पोहोचला आहे. मुंबईत सध्या 23 हजार 694 सक्रिय रुग्ण आहेत. आज 56 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 39 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 41 पुरुष आणि 15 महिला रुग्ण होत्या.
मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्क्यांवर पोहचला आहे. तर रुग्ण वाढीचा दर 1.33 टक्के इतका आहे. मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 52 दिवस इतका आहे. मुंबईत सध्या ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत अशा 732 चाळी आणि झोपडपट्टी असलेले विभागात कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आले आहेत. तर कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 6,751 इमारतीमधील काही माळे, काही विंग तर काही इमारती पूर्ण सिल करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत कोरोनाचे निदान करण्यासाठी 4,15,390 चाचण्या करण्यात आल्या आहेत.