प्रकासम (आंध्रप्रदेश)- जिल्ह्यातील कुरिचेडू येथे सॅनिटायझर पिल्याने 9 जणांच्या मृत्यूची घटना घडली होती. या घटनेतील मृतांची संख्या वाढली असून आता ती 13 झाली आहे.
याबाबत बोलताना दारसीचे पोलीस उपाधीक्षक प्रकासा राव म्हणाले, सर्व मृत व्यक्ती या गरीब कुटुंबातील आहेत. 60 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने 10 दिवसाआधी कुरिचेडू येथील 2 सरकारी दारूची दुकाने बंद करण्यात आली होती. त्यामुळे, मृत व्यक्तींनी औषधालयातून सॅनिटायझरच्या बाटल्या विकत घेऊन ते पिले. तसेच मृतांनी फक्त सॅनिटायझरच पिले असून देशी दारूत सॅनिटायझर घोळून पिल्याच्या अफवांना त्यांनी नकार दिला आहे.
दरम्यान, मृतांमध्ये 3 भिकारी, 3 रिक्षावाले व 3 हमालांचा समावेश आहे. दरम्यान या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.