ETV Bharat / briefs

परभणीत आणखी 12 कोरोनाबाधितांची भर; एकूण रुग्णसंख्या 216 वर - 12 new corona patients parbhani

जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यामध्ये आज शनिवारी 2 रुग्णांची भर पडली. यामध्ये एकट्या गंगाखेड शहरातील 9 रुग्ण आहेत, तर अन्य 3 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये परभणी शहरातील जुना पेडगाव रस्त्यावरील 58 वर्षीय पुरुष, तसेच मध्यवस्तीतील कडबी मंडई भागातील 48 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

Corona hospital
Corona hospital
author img

By

Published : Jul 11, 2020, 6:34 PM IST

परभणी- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज पहाटे एक, तर सकाळी दोन आणि दुपारी आलेल्या अहवालात नऊ, असे एकूण 12 संशयित रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 216 एवढी झाली आहे. विशेष म्हणजे, आजच्या अहवालात गंगाखेड येथील व्यापाऱ्याच्या विवाह स्वागत समारंभात सहभागी झालेल्या संशयित रुग्णांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यामध्ये आज शनिवारी 2 रुग्णांची भर पडली. यामध्ये एकट्या गंगाखेड शहरातील 9 रुग्ण आहेत, तर अन्य 3 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये परभणी शहरातील जुना पेडगाव रस्त्यावरील 58 वर्षीय पुरुष, तसेच मध्यवस्तीतील कडबी मंडई भागातील 48 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. याप्रमाणेच आज पहाटे सेलूच्या पोलीस वसाहतीतील एक व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. दरम्यान, परभणीच्या कडबी मंडईतील व्यक्ती हा यापूर्वी कोरोनाबाधीत व्यक्तीच्या संपर्कातील आहे. तर जुना पेडगाव रस्त्यावरील आणि सेलूच्या पोलीस वसाहतीतील कोरोनाबाधित रुग्ण नवीन असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.

विशेष म्हणजे, गंगाखेडमधील 9 रुग्ण हे शहरातील एका व्यापाऱ्याने आपल्या चिरंजीवासाठी आयोजित केलेल्या विवाह स्वागत समारंभासाठी जमलेल्या गर्दीमधील आहेत. यापूर्वी देखील यासंबंधातील 10 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये व्यापाऱ्याच्या घरातील रुग्णांचा देखील समावेश आहे.

या स्वागत समारंभानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. तिचे लोण आता संपूर्ण शहरात पसरत असल्याचे शनिवारी आलेल्या अहवालातून स्पष्ट होऊ लागले आहे. गंगाखेडमध्ये शनिवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ओमनगरमधील 36 वर्षीय पुरुष, योगेश्‍वरी कॉलनीतील 59 वर्षीय पुरुष, तिवट गल्ली येथील 13 वर्षीय मुलगी, तर 16 वर्षीय मुलगा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात अनुक्रमे 60 व 50 वर्षांचे पुरुष, तर 40, 27 व 77 वर्षीय महिला, असे एकूण 9 रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 21 वर पोहोचली आहे.

या बाधितांमध्ये 3 डॉक्टर्स आणि एका नगरसेवकाचा समावेश असल्याचे समजते. दरम्यान, आजच्या रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 216 एवढी झाली आहे. त्यातील 100 जण प्रत्यक्ष कोरोना संक्रमित कक्षात उपचार घेत आहेत, तर यापूर्वी 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच 111 रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

बाधितांचे सर्व भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर

गंगाखेड शहरातील आंबेडकर नगर, तिवट गल्ली, योगेश्‍वर कॉलनी, ओमनगरचा भाग जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे, तर या पाठोपाठ सेलू शहरातील पारीख कॉलनीचा परिसरही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. तर परभणी शहरातील जुना पेडगाव रोड आणि कडबी मंडई या परिसरात यापूर्वी आढळलेल्या रुग्णांमुळे हे परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर आहेत. त्यामुळे या सर्व कोरोनाबाधितांच्या भागांमध्ये स्थानिक पालिका प्रशासनाकडून निर्जंतुकीकरणाचे काम आणि पोलिसांकडून हा परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.