मुंबई- मंगळवार मुंबईत कोरोनाचे 717 नवे रुग्ण आढळून आल्याचा दावा करत पालिकेने राज्य सरकार आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून आपली पाठ थोपटून घेतली होती. मात्र आज पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईत आज नव्याने 1 हजार 118 रुग्ण आढळून आले आहे, तर 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज वाढलेल्या रुग्णांमुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 11 हजार 964 वर पोहोचला आहे, तर आज झालेल्या 60 मृत्यूंमुळे मृतांचा आकडा 6 हजार 244 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 916 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत एकूण 85 हजार 327 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सध्या 20 हजार 123 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 76 टक्क्यांवर पोहोचला आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 72 दिवसांवर पोहोचला आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 60 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 42 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 43 पुरुष तर 17 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून आज 916 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 85 हजार 327 वर पोहोचला आहे.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 72 दिवस तर सरासरी दर 0.97 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 623 चाळी आणि झोपडपट्टी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून त्या सील करण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 960 इमारती व इमारतींच्या विंग सील करण्यात आल्या आहेत. कोरोनाचे निदान करण्यासाठी 5 लाख 5 हजार 982 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.