नवी दिल्ली : आर्थिक नुकसानीमुळे झोमॅटोने 225 शहरांमधील आपली सेवा बंद केली आहे. कंपनीने सांगितले की, त्यांचे आर्थिक नुकसान 346 कोटींहून अधिक झाले आहे, अशा परिस्थितीत त्यानंतर दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नव्हता त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. ज्या शहरांमध्ये नफा होत नसल्याचे दिसते होते तिथल्या कंपन्या बंद कराव्यात असा विचार सुरू होता. तसेच, कंपनीचे सातत्याने नुकसान वाढत होते. शेवटी तेथील सेवा बंद केल्या आहेत. दरम्यान, कोणत्या ठिकाणचा समावेश आहे, याची माहिती कंपनीने अद्याप दिलेली नाही.
तोटा पाच पटीने वाढून 346 कोटी रुपयांवर : कंपनीने सांगितले आहे, की ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत या ठिकाणी कंपनीचे नुकसान झाले आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत त्यांच्या महसुलात 75 टक्क्यांनी घट झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे. त्यांच्या मते ते 1,948 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मात्र, कंपनीचा तोटा पाच पटीने वाढून 346 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यावेळी झोमॅटोने माहिती दिली की, ऑर्डर वारंवारता वाढवण्यासाठी त्यांनी गोल्ड सबस्क्रिप्शन सुरू केले आहे. या कार्यक्रमात 9 लाख लोक सामील झाल्याचा दावाही कंपनीने केला आहे.
कंपनी तोट्यात असताना ही भरती : असे असूनही कंपनीने दिलेली माहिती नोकरीच्या दृष्टीने चांगली आहे. कंपनीचे संस्थापक दीपक गोयल यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी सांगितले आहे, की झोमॅटो लवकरच तुमच्या दारी येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी सुमारे 800 लोकांना कामावर घेणार आहे. कंपनी तोट्यात असताना ही भरती होत आहे. इतकेच नाही तर कंपनीने 225 शहरांमध्ये आपली सेवा बंद केली आहे, तरीही ती हायरिंग करणार आहे.
75% वाढून 1,948 कोटी रुपये : झोमॅटो हे भारतातील सर्वाधिक वापरले जाणारे अन्न वितरण अॅप आहे. गेल्या वर्षी (2021-22)मध्ये, कंपनीचा फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी व्यवसाय देशातील 1,000 हून अधिक शहरांमध्ये चालू होता. परंतु, आर्थिक वर्ष (2023)च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा तोटा 5 पटीने वाढून 343 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. परिणामी, महसूल वार्षिक आधारावर 1,112 कोटी रुपयांवरून 75% वाढून 1,948 कोटी रुपये झाला.
स्टॉरंट डिस्कवरी सर्व्हिस : ही कंपनी 2008 मध्ये गुरुग्राम, हरियाणातून सुरू झाली होती. पहिले नाव झोमॅटो (Zomato) नाही तर (Foodiebay)होते, जे (ebay)वरून ठेवण्यात आले होते. याची स्थापना दीपंदर गोयल आणि पंकज चढ्ढा यांनी केली होती. (2008)मध्ये झोमॅटो ही फूड डिलिव्हरी सर्व्हिस नसून, रेस्टॉरंट डिस्कवरी सर्व्हिस होती. म्हणजेच, तिचे काम शहरातील वेगवेगळ्या रेस्टॉरंटची माहिती देणे हे होते.
हेही वाचा : H. K. Patil : थोरात लवकरच राजीमाना मागे घेतील; चर्चेनंतर एच.के पाटलांची प्रतिक्रिया