भोपाळ - कोरोनाच्या काळात प्रतिकारक्षमता वाढविण्याकरिता महत्त्वाची बातमी आहे. कोरोनाबाधित रुग्णांना आणि कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींनी आहारात कडकनाथ कोंबडीचा समावेश केल्यास त्यांच्या प्रतिकारक्षमतेत वाढ होते असा दावा करण्यात येत आहे. याबाबतचे पत्र झाबुआ कडकनाथ रिसर्च सेंटर (KRC) आणि कृषी विकास केंद्राने (KVK) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि आरोग्य संशोधन केंद्र विभागाला ((DHRC) पत्र लिहिले आहे.
कडकनाथ कोंबडीमध्ये प्रथिनांचे अधिक प्रमाण आणि कमी फॅट असल्याचे झाबुआ कडकनाथ रिसर्च सेंटरने म्हटले आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर व बरे झाल्यानंतर कोलेस्टॉरॉल मुक्त असलेल्या कडकनाथ कोंबडीच्या चिकनचा आहारात समावेश करावा, असे झाबुआ कडकनाथ सेंटरने म्हटले आहे.
हेही वाचा-VIDEO खांद्यावर हात ठेवताच काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी कार्यकर्त्याला मारली थप्पड
रोगप्रतिकारक क्षमता असल्याने मध्यप्रदेशातील कडकनाथ कोंबड्यांच्या मागणीत वाढ
मध्यप्रदेशातील निमाड क्षेत्रात आदिवासीबहुल ठिकाणी आढळणाऱ्या कडकनाथ कोंबड्या प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी फायदेशीर आहेत. कोरोना महामारीत अनेक लोक प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी विविध प्रयत्न करत आहेत. मध्यप्रदेशातील कडकनाथ कोंबडीमध्ये प्रोटीनटचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ह्दयरोग, श्वसनाचे रोग आणि लोहाची कमतरता असलेल्या रुग्णांना कडकनाथ कोंबड्यांचे चिकन उपयुक्त असते. रिसर्च सेंटरने कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींचा आहारात कडकनाथ कोंबड्यांच्या चिकनचा समावेश करण्याची आयसीएमआरने मागणी केली आहे.
हेही वाचा-पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जुलैला केंद्रीय मंत्रिमंडळाची घेणार बैठक
मध्यप्रदेश सरकारने कडकनाथ कोंबड्यांच्या विक्रीसाठी तयार केली योजना-
कोरोनाच्या काळात अनेकांनी रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे कडकनाथ कोंबड्यांची मागणी वाढली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता मध्यप्रदेश सरकारने कडकनाथ कोंबड्यांचे उत्पादन व विक्री वाढविण्यासाठी विशेष योजना तयार केली आहे. त्यामुळे कुक्कुटपालकांना फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा-भाजपमधल्या 'आऊटसोर्स ताई-माई-अक्का आज गायब असतील; उत्तरप्रदेश प्रकरणावरून मंत्री ठाकूर कडाडल्या
कडकनाथ कोंबडीला जीआय टॅग
पशुपालन विभागाचे अप्पर मुख्य सचिव जे. एन. कंसोटिया म्हणाले, की कडकनाथ कुक्कुट पालनासाठी अलीराजपूर, बडवानी, धार आणि झाबुआमध्ये ३०० सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. झाबुआ जिल्ह्यातील कडकनाथ कोंबडीला जीआय टॅग मिळालेला आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हेदेखील कडकनाथ कोंबड्यांचे पालन करतात.