ETV Bharat / bharat

Delhi Crime News : वडिलांसमोर मुलाची चाकूने भोसकून हत्या, दोन वर्षांपूर्वीच्या घटनेचा घेतला बदला - दिल्ली क्राइम न्यूज

राजधानी दिल्लीत सातत्याने चाकूने हल्ला करण्याच्या घटना घडत आहेत. आता दिल्ली कँट पोलीस स्टेशन परिसरात बदमाशांनी एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली आहे.

youth stabbed to death in Delhi
दिल्लीत तरुणाची चाकूने वार करून हत्या
author img

By

Published : Jun 25, 2023, 8:58 PM IST

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. ताजे प्रकरण दिल्ली कॅंट पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथे एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. हे प्रकरण 24 जूनच्या रात्रीचे आहे. एका बदमाशाने तरुणाचे दोन्ही हात पकडले आणि दुसऱ्याने धारदार चाकूने वार करून त्याची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. विकास उर्फ ​​नकुल उर्फ ​​फत्ती आणि वंशू अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही दिल्लीचे रहिवासी आहेत.

तरुणाचा रुग्णालयात मृत्यू : दक्षिण पश्चिम विभागीय पोलीस आयुक्त मनोज सी यांनी सांगितले की, '24 जूनच्या रात्री पीसीआर कॉल आला होता. ज्यामध्ये दोन बदमाशांनी लग्नाच्या मिरवणुकीजवळ एका व्यक्तीला भोसकून गंभीर जखमी केले. जखमी तरुणाला एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आशिष उर्फ ​​धनू नावाच्या तरुणावर हल्ला झाल्याचे समजले. त्यानंतर एम्सच्या ट्रॉमा सेंटर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.'

सूडाच्या भावनेने हल्ला केला : पोलीस पथकाने मृताचे वडील आणि प्रत्यक्षदर्शी यांचे जबाब घेतले. त्याद्वारे समजले की, विकास आणि वंशू यांनी सायंकाळी सहाच्या सुमारास आशिष उर्फ ​​धनू याला लग्नाच्या घराजवळ बोलावले. तेथे विकासने आशिषला पकडले आणि वंशूने त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले आणि तेथून पळ काढला. आशिषच्या वडिलांनी स्थानिक लोकांच्या मदतीने त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. दोन वर्षांपूर्वी तरुणाने दोन्ही आरोपींना बेदम मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. बदमाशांनी सूडाच्या भावनेने हा हल्ला केला.

आरोपींना अटक : पोलिसांच्या पथकाने तांत्रिक निगराणीच्या मदतीने तपास सुरू केला. अखेर 24 तासात विकास आणि वंशूला पकडण्यात आले. चौकशीत आरोपीने सांगितले की, हत्येचा प्लान अगोदरच्या रात्री रचला होता. दुसऱ्या दिवशी 24 जून रोजी सायंकाळी उशिरा तो आशिषच्या घरी बोलावण्यासाठी गेला आणि लग्नाच्या घराजवळ बोलावल्यानंतर त्याच्यावर हल्ला करून त्याची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासवर यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. तर वंशू एका मांसाच्या दुकानात काम करतो आणि त्याच्यावर यापूर्वी 3 गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा :

  1. Mumbai Crime News : कुत्र्यांना खायला घालणे पडले महागात..महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला
  2. Pune Crime : पत्नीवर पतीसह मित्रांकडून सामूहिक बलात्कार; गुन्हा दाखल
  3. Cow Rescued In Thane : ग्रामीण पोलिसांनी गो-तस्करांच्या तावडीतून ५० जनावरांची केली सुटका, एकाला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.