नवी दिल्ली/गाझियाबाद - प्रेम प्रकरणातून प्रियकराची हत्या केल्याची घटना गाझियाबाद येथे उघडकीस आली आहे. या हत्येमध्ये प्रियसीच्या कुटुंबीयांचा समावेश असल्याची माहिती पुढे येत आहे. कुटुंबीयांनी युवकाची हत्या करून जाळण्याच्या प्रयत्न केला. त्यानंतर घरातच त्याला जमिनीमध्ये दाबण्यात आले.
घरच्यांचा होता विरोध -
मुरसलीम असं मृत प्रियकराचे नाव आहे. मुरसलीम आणि त्याच्या प्रेमिकेच्या प्रेम सबंधांना मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. प्रेमिकेच्या घरातून त्याचा शव जप्त करण्यात आला. प्रेमिकेच्या कुटुंबीयांनी मुरसलीमची हत्या केल्याचा आरोप आहे. मुरसलीम हा बऱ्याच दिवसांपासून बेपत्ता होता. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. तसेच नातेवाईकांकडूनही त्याचा शोध घेणं सुरू होतं. काही नातेवाईकांनी प्रियसीवर संशय व्यक्त केला. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तसेच मृतकाचा फोन प्रियसीच्या घरी ट्रेस झाल्यानं पोलिसांनी धाड टाकली. त्यात जमिनीत पुरलेलं प्रेत बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.