चेन्नई Crime News : तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण शहराला हादरवून टाकलं आहे.
मृतदेहाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर लावला : येथे एका नर्सिंगच्या विद्यार्थ्यानं आधी त्याच्या प्रेयसीचा खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर लावला. हे स्टेटस जेव्हा त्याच्या मित्रांनी पाहिलं तेव्हा त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी यावर लगेच अॅक्शन घेत शोध सुरू केला. अखेर क्रोमपेटमधल्या सीएलसी वर्क्स रोडवरील हॉटेलमध्ये पोलिसांचा शोध थांबला. फौसिया (२०) असं पीडितेचं नाव असून, आशिक (२०) हा गुन्हेगार आहे. दोघंही केरळमधील कोल्लमचे रहिवासी आहेत. त्यांनी शुक्रवारी सकाळी १०:३० वाजता हॉटेलमध्ये चेक इन केले होतं. पोलिसांनी तपास केला असता, या जोडप्याच्या इतिहासाबद्दल धक्कादायक तपशील समोर आला.
कसा खून केला : फौसिया आणि आशिक गेल्या पाच वर्षांपासून नात्यात होते. त्यांनी गुपचूप लग्न केलं. या दोघांना एक बाळ होतं जे त्यांनी चिकमंगळूरमध्ये दत्तक दिलं. न्यू कॉलनी येथील वसतिगृहात राहणारी फौसिया ही नर्सिंगच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. ती गेल्या तीन दिवसांपासून कॉलेजमध्ये गेली नव्हती. फौसियानं फोनवर आशिकचे दुसर्या महिलेसोबतचे फोटो पाहिले. त्यानंतर या जोडप्यामध्ये वाद सुरू झाला. रागाच्या भरात आशिकनं फौसियाचा टी-शर्टनं गळा आवळून खून केला. यानंतर त्यानं तिच्या मृतदेहाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर अपलोड केला.
याआधी तुरुंगात गेला होता : आशिकच्या विवाहबाह्य प्रकरणांमुळे दोन वर्षांपूर्वी हे दोघं वेगळे झाले होते. फौसियानं यापूर्वी केरळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आशिकवर मुलांचं लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला तुरुंगवास भोगावा लागला होता. इतकं घडल्यानंतरही आशिकची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर या जोडप्यानं समेट केला. या घृणास्पद हत्येमागे आणखी काही कारणं आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा :