ETV Bharat / bharat

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन - इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

देशातील बर्‍याच भागात पेट्रोल 100 रुपयांवर तर डिझेल 90 रुपयांच्या पुढे गेले आहे. यावरून आज युवक काँग्रेस संघटनेकडून शास्त्री भवन येथील पेट्रोलियम मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात आले.

युवा काँग्रेसचे आंदोलन
युवा काँग्रेसचे आंदोलन
author img

By

Published : Feb 20, 2021, 7:22 PM IST

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग वाढतच आहेत. देशातील बर्‍याच भागात पेट्रोल 100 रुपयांवर तर डिझेल 90 रुपयांच्या पुढे गेले आहे. यावरून आज युवक काँग्रेस संघटनेकडून शास्त्री भवन येथील पेट्रोलियम मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यांनी इंधन दरामध्ये कपात करण्याची मागणी केली.

इंधन दरवाढीविरोधात युवा काँग्रेसचे आंदोलन

गेल्या सात वर्षात मोदी सरकारने काहीच केले नाही. सरकार लोकांचे लक्ष खऱ्या प्रश्नांकडून वळवण्यासाठी फक्त 'जुमला' देत आहे. पण आता असे होणार नाही. शेतकरी रस्त्यावर बसले आहेत, गृहिणींना अडचणीचा सामना करावा लागत आहे, असे आयसीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. म्हणाले. मोदी आहेत तर महागाई आहे, अशी घोषणा त्यांनी केली. तसेच सरकारने इंधनाच्या किंमती कमी न केल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.

'इंधनकरजीवी' मोदी सरकार -

इंधन दर प्रकरणी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत भाजपावर टीका केली होती. केंद्र सरकारने गेल्या साडेसहा वर्षात पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात जनतेकडून 21.50 लाख कोटी रुपये वसूल केले आहेत, असा दावा त्यांनी केला. 'इंधनकरजीवी' मोदी सरकार देशातील लोकांसाठी एक शाप बनले आहे, असेही ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.