अहमदाबाद : अहमदाबाद येथील सहा वर्षीय कनिका भगतिया 3 बाय 3 रुबिक क्यूब सोडवणारी सर्वात तरुण भारतीय बनली आहे. तिचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आले आहे. कनिकाने अवघ्या 4 वर्षांची असताना रुबिक क्यूब कसे सोडवायचे हे शिकून घेतले होते. सध्या ती रुबिक क्यूब्सचे आठ सर्वात आव्हानात्मक प्रकार यशस्वीरित्या सोडवू शकते.
लहानपणापासूनच मिळाले धडे : कनिकाचे वडील केयूर भगतिया सांगतात की, कोविड लाट येण्याच्या काही दिवसांपूर्वी आम्ही एका वाढदिवसाच्या पार्टीला भेट दिली होती. तेव्हा ती फक्त साडेचार वर्षांची होती. तेथे कनिकाला रिटर्न गिफ्ट म्हणून रुबिक क्यूब मिळाले. तिने क्यूबची सिंगल साइड सोडवली आणि बाकीचा क्यूब कसा सोडवायचा असे विचारले. त्यानंतर आम्हाला जवळच एक अकादमी सापडली जिथे ती मूलभूत क्यूब्स कसे सोडवायचे ते शिकली. तिथूनच तिचा हा प्रवास सुरू झाला.
सायना नेहवाल आहे प्रेरणा : बॅडमिंटनपटू सायना नेहवाल ही या युवा क्यूब मास्टरची प्रमुख प्रेरणास्त्रोत आहे. कनिका म्हणते की, तिने तिच्या वडिलांना सायना नेहवालचा चित्रपट पाहताना पाहिले होते.
एकदा बाबा सायना नेहवालचा चित्रपट पाहत होते. मी त्यांना विचारले असता त्यांनी मला सांगितले की, ती बॅडमिंटन खेळते. तिने अनेक मेडल्स जिंकली आहेत. मी त्यांना विचारले की मेडल म्हणजे काय? तेव्हा त्यांनी मला सांगितले की, मेडल कोणालाही विकत घेता येत नाही. त्यासाठी सराव करावा लागतो. मोहनत घ्यावी लागते. - कनिका भगतिया
स्केटिंग आणि मॉडेलिंगही करते : क्यूब्स सोडवण्यासोबतच कनिका स्केटिंग आणि मॉडेलिंग देखील करते. तिच्या नावावर आठ आंतरराष्ट्रीय विक्रम आहेत. यामध्ये 'इनलाइन स्केटिंग करताना सोडवलेले रुबिक क्यूब्सचे जास्तीत जास्त विविध प्रकार' या जागतिक विक्रमाचाही समावेश आहे. कनिकाचे स्केटिंग प्रशिक्षक परव पंड्या सांगतात की, ती सुमारे दीड ते दोन वर्षांपासून त्यांच्यासोबत स्केटिंग शिकत आहे.
तिने राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्या स्पर्धा तिने चांगल्या क्रमांकाने जिंकल्या देखील आहेत. तिने गोवा, आग्रा, सुरत बडोदा इत्यादी ठिकाणी राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये भाग घेत स्केटिंगमध्ये उत्कृष्ट विक्रम केले आहेत. - परव पंड्या, कनिकाचे स्केटिंग प्रशिक्षक
हेही वाचा :