सुलिया (कर्नाटक) Youngest child who reached Umling La : दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुलिया येथील साडेतीन वर्षाच्या जलील रहमाननं आपल्या पालकांसह मोठा पराक्रम केलायं. त्यानं लडाखमधील उमलिंग ला मध्ये 19 हजार 24 फूट उंची गाठून नवीन कामगिरी केली आहे. सुलिया तालुक्यातील हेलगेट येथील तौहीद रहमान, पत्नी जश्मिया, मुलगा जलील रहमान यांच्यासोबत बुलेटवरून उमलिंग ला इथं पोहोचले होते.
जलीलने केला मोठा पराक्रम : या ठिकाणी पोहोचणारा जलील रहमान सर्वात कमी वयाचा मुलगा आहे. हे ठिकाण माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प (17 हजार 498) पेक्षा उंच आहे. इथं ऑक्सिजन पातळी केवळ 43 टक्के आहे. तसंच तापमान शून्यापेक्षा दोन अंशानं कमी आहे. जलील रहमाननं केलेला विक्रम इंडिया रेकॉर्ड बुकमध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.
15 ऑगस्ट रोजी प्रवासाला सुरवात : यासंदर्भात ईटीव्ही भारतशी बोलताना तौहीद रहमान म्हणाले की, प्रवास करणं माझा छंद आहे. यापूर्वी मी माझ्या मित्रांसोबत कारनं भारतभर फिरायचो. त्यावेळी मी जवळपास 6 वेळा लडाखला गेलो होतो. मी माझ्या पत्नी, मुलासह बाईकवरून उमलिंग ला येण्याची ही पहिलीच वेळ आहे. 15 ऑगस्ट रोजी आम्ही सुलियातून निघालो होते. 24 दिवसांच्या प्रवासानंतर आम्ही शहरात परतलो आहोत. आतापर्यंत 19 देशांमध्ये 5 हजार किलोमीटरचा प्रवास केला असल्याचं त्यांनी म्हटलंय.
भारतीय जवानांनी केलं स्वागत : आम्ही पहिल्यांदाच इथं आलो, तेव्हा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं मुलाला समस्यांचा सामना करावा लागला. परंतु त्यानं लगेच या परिसराशी जुळवून घेतलं. आम्ही आमच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर वैद्यकीय तज्ञांच्या मदतीनं आमचा प्रवास सुरू ठेवला, असं तौहीद रहमान यांनी सांगितलं. आमच्या गावात जे अन्न उपलब्ध होतं, ते इथं उपलब्ध नव्हतं. त्यामुळं जेवणाची व्यवस्था करण्यात अडचण होती. माझा मुलगा, पत्नी या प्रवासानं खूप आनंदी आहेत. आम्ही दररोज 300 ते 350 किमी प्रवास करायचो. रस्ता चांगला असेल तर ४०० किलोमीटरचा प्रवास करता आला असता. आम्ही उमलिंग ला मध्ये पोहोचताच भारतीय लष्करातील अधिकारी, जवानांनी आमचं स्वागत केल्याचं तौहीद रहमान यांनी सांगितलं..
आत्तापर्यंत, पालकांसह उमलिंग ला गाठणाऱ्या सर्वात लहान व्यक्तीचा विक्रम हरियाणातील गुरुग्राम येथील धीमाही पराते नावाच्या सात वर्षीय मुलीच्या नावावर आहे. 12 ऑगस्ट 2022 रोजी गुरुग्रामहून तीनं कारनं प्रवास करून उमलिंग ला गाठलं होतं. त्यामुळं हा विक्रम रहमान दाम्पत्यानं आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलासोबत प्रवास करून मोडला आहे.
हेही वाचा -