Congress BJP Kanrnataka Govt कर्नाटकात सरकारी नोकरीसाठी महिलेला एखाद्या व्यक्तीसोबत झोपावे लागते खरगे यांचा आरोप - Congress MLA Priyank Kharge
कर्नाटकमधील भाजपच्या सरकारचा कारभार अत्यंत भ्रष्ट पद्धतीने चालला आहे. कर्नाटकात एखाद्या महिलेला सरकारी नोकरी हवी मिळवायची असेल तर तिला एखाद्या व्यक्तीसोबत झोपावे लागते, असा गंभीर आरोप कर्नाटक काँग्रेसचे आमदार प्रियांक खरगे MLA Priyank Kharge allege यांनी केला आहे.
Congress BJP Kanrnataka Govt
नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजपकडून भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप कर्नाटकचे आमदार प्रियांक खरगे MLA Priyank Kharge allege यांनी केला आहे. सरकारने शासकीय नोकरीतील पदे चक्क विक्रीला काढली आहेत, असेही ते म्हणाले. नोकरीसाठी लाच द्यावी लागते तर तरुणींना एखाद्यासोबत झोपावे लागते, असाही आरोप त्यांनी केला आहे.
कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते आणि आमदार प्रियांक खरगे यांनी शुक्रवारी भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर गंभीर आरोप केले की, राज्यात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी पुरुषांना लाच द्यावी लागते तर तरुणींना कुणासोबत झोपावे लागते. हा अतिशय गंभीर प्रकार राज्यात सुरू आहे. भाजपच्या राज्यात सर्वत्र अनागोंदी सुरू आहे.