ETV Bharat / bharat

कर्जदाराने केलेल्या छळामुळे तरुणाची आत्महत्या, कुटुंबातील सदस्यांचाही छळ - कर्जदाराने केलेल्या छळामुळे तरुणाची आत्महत्या

अभ्यासासाठी लोन अ‍ॅपवरून कर्ज घेतले. मात्र, व्यवस्थापकांनी पैसे परत करण्यासाठी त्याच्यावर खूप दबाव आणला. त्याचे मॉर्फ केलेले नग्न चित्र व्हॉट्सअप वरुन व्हायरल केले. त्यामुळे तीव्र नैराश्याने ग्रासलेल्या या तरुणाने आत्महत्या केली. मात्र, पूर्व गोदावरी जिल्ह्यात मृत्यू झाल्यानंतरही त्यांनी त्याच्या मोबाईलवरुन संदेश पाठवल्याने आत्महत्येमागील कारण उघड झाले.

कर्जदाराने केलेल्या छळामुळे तरुणाची आत्महत्या

author img

By

Published : Jun 28, 2022, 5:35 PM IST

राजमहेंद्रवरम: एक तरुण त्याच्या अभ्यासासाठी लोन अ‍ॅपवरून कर्ज घेतले. मात्र, व्यवस्थापकांनी पैसे परत करण्यासाठी त्याच्यावर खूप दबाव आणला. त्याचे मॉर्फ केलेले नग्न चित्र व्हॉट्सअप वरुन व्हायरल केले. त्यामुळे तीव्र नैराश्याने ग्रासलेल्या या तरुणाने आत्महत्या केली. मात्र, पूर्व गोदावरी जिल्ह्यात मृत्यू झाल्यानंतरही त्यांनी त्याच्या मोबाईलवरुन संदेश पाठवल्याने आत्महत्येमागील कारण उघड झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व गोदावरी जिल्ह्यातील कडियमच्या कोना सतीश (२८) याने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. तो एक निष्पाप सालस व्यक्ती आहे. त्याचे वडील फुलविक्रेते आहेत आणि आई गृहिणी आहे. त्याने आपला सेल फोनवरुन त्याच्या पुढील अभ्यासासाठी लोन अ‍ॅपवरून कर्ज काढले. अ‍ॅपच्या व्यवस्थापकांनी पैसे परत करण्यासाठी त्याच्यावर खूप दबाव आणला. सतीशच्या चेहऱ्याचा फोटो दुसऱ्या एका नग्न चित्रावर चिकटवून इतर लोकांना व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर पाठवला. सतीशला हे कळत होतं. त्यानंतर खूप उदास झाला. या महिन्याच्या २४ तारखेला सिनेमाला जात असल्याचे सांगून तो घरून निघाला. त्याच रात्री भीमावरमजवळ ट्रेनमधून उडी घेऊन आत्महत्या केली. ही बाब दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. दुसरीकडे, सतीशच्या कुटुंबीयांना या महिन्याच्या २६ तारखेपासून मोबाईलवर मेसेज येत होते की, त्यातून कर्ज फेडण्याची विनंती केली जात होती. सतीषला मॉर्फिंग करून त्याचेच न्यूड्सही पाठवले जात होते. कर्ज न भरल्यास कुटुंबातील सदस्यांचे फोटो सर्वांना पाठवण्याची धमकीही ते देत आहेत. पीडित कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. सीआय रामबाबू म्हणाले की, तक्रार प्राप्त झाली असून त्याची चौकशी केली जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.