ETV Bharat / bharat

Jaunpur Lover Murder : प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकराला झाडाला बांधून केली बेदम मारहाण.. प्रियकराचा झाला मृत्यू.. गुन्हा दाखल

जौनपूरमध्ये प्रेयसीच्या नातेवाईकांनी प्रियकराला कडुलिंबाच्या झाडाला दोरीने बांधून काठ्यांनी मारहाण ( Jaunpur Lover Murder ) केली. या मारहाणीत प्रियकराचा मृत्यू ( young man life lost due to love affair ) झाला. या प्रकरणी प्रेयसीच्या घरातील दोन तसेच इतर 6 अनोळखी लोकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला ( lover death in jaunpur ) आहे.

author img

By

Published : Jul 15, 2022, 5:37 PM IST

Jaunpur Lover Murder
जौनपूरमध्ये प्रियकराची हत्या

जौनपूर ( उत्तरप्रदेश ) : जिल्ह्यातील मुंगराबादशाहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील विजाधर्मौ गावात प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला प्रेयसीच्या नातेवाईकांनी झाडाला ( Jaunpur Lover Murder ) बांधले. त्यानंतर लाठ्याकाठ्याने बेदम मारहाण केली. या तालिबानी शिक्षेमुळे शुक्रवारी सकाळी या तरुणाचा मृत्यू ( young man life lost due to love affair ) झाला. अरविंद पाल (२२) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी सकाळपासून स्थानिक पोलिस, सीओ मच्छलीशहर, एसपी देहाट यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र याबाबत बोलणे होऊ शकले ( lover death in jaunpur ) नाही.

अनेक दिवसांपासून होते प्रेमसंबंध : उल्लेखनीय आहे की, जिल्ह्यातील मुंगराबादशाहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील आशापूर सराफट्टू येथील रहिवासी रामकृपाल पाल यांचा मुलगा अरविंद याचे शेजारील बिजाधर माळ या गावातील एका तरुणीसोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. गुरुवारी रात्री त्याला एक फोन आला. त्यानंतर अरविंद प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला. रात्री प्रेयसीच्या नातेवाईकांना ती घराबाहेर फिरताना दिसली.

अन् झाला मृत्यू : दोघांना बाहेर फिरताना पाहिल्यानंतर प्रेयसीच्या घरच्यांनी अरविंदला कडुलिंबाच्या झाडाला दोरीने बांधून काठ्यांनी बेदम मारहाण केली. रात्रीच कोणीतरी अरविंदच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. मात्र कुटुंबीय घाबरून घटनास्थळी आले नाहीत. सकाळी अरविंदचे नातेवाईक आले तेव्हा रक्तबंबाळ झालेला अरविंद तहानेने व्याकूळ झाला होता. घरच्यांनी अरविंदला पाणी दिले. मात्र काही वेळाने त्याचा मृत्यू झाला.

गुन्हा केला दाखल : या घटनेची माहिती मुंगराबादशाहपूर पोलीस स्टेशनच्या निदर्शनास येताच सदानंद राय, पोलीस उपनिरीक्षक अजय पांडे आणि पवनरा पोलीस ठाण्याचे प्रभारी रामसारिख गौतम घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास करून मृतदेह ताब्यात घेतला. यासंदर्भात सदानंद राय यांनी सांगितले की, प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. मृताचे वडील राम कृपाल यांच्या फिर्यादीवरून दोन नावाजलेल्या आणि सहा अनोळखी लोकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Girl Fighting Viral Video : प्रेमप्रकरणातून कॉलेज तरुणींमध्ये तुफान हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.