ETV Bharat / bharat

Baba Ramdev : रामदेव बाबा यांचे खळबळजनक वक्तव्य ; म्हणाले, 'देशातील 90 टक्के राजकारणी..' - रामदेव बाबा भिलवाडा

भिलवाडा येथील योग शिबिरात योगगुरू रामदेव बाबा यांनी भारतातील राजकारण्यांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, देशातील 90 टक्के राजकारणी राजयोगासाठी योगासने करतात. तसेच सोशल मीडियामुळे पिढी बरबाद होत असल्याचे ते म्हणाले.

Baba Ramdev
बाबा रामदेव
author img

By

Published : May 27, 2023, 4:05 PM IST

Updated : May 27, 2023, 4:11 PM IST

पहा काय म्हणाले रामदेव बाबा

भिलवाडा (राजस्थान) : राजस्थानमधील भिलवाडा येथे योगगुरू स्वामी रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली आज तीन दिवसीय मेगा ध्यान आणि योग शिबिर सुरू झाले. योग शिबिराच्या पहिल्या दिवशी बाबा रामदेव यांनी देशात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, देशातील 90 टक्के राजकारणी योगासने करतात. योग केल्याने राजयोग येतो, असे या राजकारण्यांचे मत आहे. राजस्थानच्या राजकारणावरही बाबा म्हणाले की, येथील नेतेही सध्या योग करण्यात मग्न आहेत.

'तुम्ही मोदींपेक्षा व्यस्त आहात का?' : योग शिबिराच्या पहिल्या दिवशी बाबा रामदेव यांनी मुलांमध्ये शिक्षण, संस्कृती आणि सामाजिक काळजीची गरज स्पष्ट केली. ते म्हणाले की, राजस्थानमध्येही अशोक गेहलोत, वसुंधरा राजे, सचिन पायलट यांच्यासह अनेक नेत्यांनी आता योगासने करण्यास सुरुवात केली आहे. बाबा रामदेव यांनी योग शिबिरा दरम्यान संबोधित करताना सांगितले की, तुम्ही प्रवासात असलात तरी प्रत्येकाने योग कधीही सोडू नये. तेथे उपस्थित योगसाधकांना प्रश्न विचारत बाबा रामदेव म्हणाले की, तुम्ही माझ्यापेक्षा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा व्यस्त आहात का? जपानसह विविध देशांचा दौरा करून नरेंद्र मोदी भारतात परतले. त्यानंतर त्यांनी पूर्ण जबाबदारीने आपले काम सुरू केले. वंदे भारत एक्सप्रेसच्या कार्यक्रमातही ते सहभागी झाले होते. देशाची जबाबदारी घेत पंतप्रधान योग करू शकतात, तर तुम्ही का करू शकत नाही?, असे बाबा रामदेव म्हणाले.

योगाचे तीन दिवसीय मोफत शिबिर : स्वामी रामदेव यांच्या मार्गदर्शनाखाली येथे शनिवारपासून तीन दिवसीय मोफत योग चिकित्सा आणि ध्यान शिबिर सुरू झाले आहे. भिलवाडासह राज्यातल्या इतर जिल्ह्यातील वृद्ध, महिला आणि लहान मुले योग शिबिराच्या ठिकाणी पोहोचली आहेत. यावेळी बाबा रामदेव यांनी विविध प्रकारची आसने आणि योगासने करून जीवनात निरोगी राहण्याचा संदेश दिला. विशेष म्हणजे स्वामी रामदेव यांच्या योग शिबिरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा :

  1. International Yoga Day:सायकलवर आयुर्वेदिक औषधे विकणारे कसे झाले योगगुरू?, वाचा ETV'भारतचा खास रिपोर्ट

Last Updated : May 27, 2023, 4:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.