ETV Bharat / bharat

Wrestlers Protest : कुस्तीपटूंचा सरकारला अल्टिमेटम, 15 जूनपर्यंत ब्रिजभूषणला अटक न झाल्यास उचलणार 'हे' पाऊल

कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ शनिवारी सोनीपतमध्ये महापंचायत झाली. यावेळी कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी 15 जूनपर्यंत आरोपी ब्रिजभूषण सिंहवर सरकारने कडक कारवाई करावी, अन्यथा कुस्तीपटू पुन्हा धरण्यावर बसतील, असे सांगितले.

Wrestlers Protest
कुस्तीपटूंचे आंदोलन
author img

By

Published : Jun 10, 2023, 10:47 PM IST

सोनीपत : सोनीपतमधील महापंचायतीत कुस्तीपटूंनी सरकारला नवा अल्टिमेटम दिला आहे. आरोपी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर 15 जूनपूर्वी कडक कारवाई न झाल्यास पुन्हा दिल्लीत आंदोलन सुरू करू, असे कुस्तीपटूंनी जाहीर केले आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, सत्यव्रत कादयन आणि विनेश फोगटचे पती सोंबीर राठी यांनी सोनीपतमध्ये आज खाप महापंचायत आयोजित केली होती. या महापंचायतीत खाप पंचायतींचे प्रतिनिधी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, बिगर राजकीय पक्षांचे नेते जमले होते.

'तर आशियाई खेळ खेळणार नाही' : या वेळी कुस्तीपटू साक्षी मलिकने सांगितले की, हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही आशियाई खेळ खेळणार नाही. आमच्यावर दबाव आणला जात असल्याचे साक्षी म्हणाली. 'मुली मानसिक तणावातून जात आहेत. दबाव टाकून पीडितांना तोडले जात आहे. या दबावाखाली अल्पवयीन मुलीचे बयाणही बदलण्यात आले. आरोपीला अटक केली असती तर दबाव निर्माण करता आला नसता', असे ती म्हणाली आहे.

कुस्तीपटू ब्रिजभूषण सिंहच्या अटकेवर ठाम : यावेळी कुस्तीपटूंनी सरकारशी झालेल्या संवादाचा तपशील सर्वांसमोर ठेवला. काही मागण्यांवर सरकारशी करार झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, आरोपी ब्रिजभूषण सिंहच्या अटकेवर अद्याप एकमत झालेले नाही. यावर कुस्तीपटू बजरंग पुनिया याने मंचावरून घोषणा केली की, सरकारने 15 जूनपर्यंत कठोर पावले उचलली नाहीत, तर 16 किंवा 17 जूनपासून पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलन करू.

'आंदोलनाचे राजकारण करत नाही' : अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या वक्तव्यावर बजरंग पुनिया याने पलटवार केला की, आमच्यावर दबाव आणला जात असल्याचे अल्पवयीन मुलीचे वडील त्यांच्या वक्तव्यातून सांगत आहेत. ब्रिजभूषण सिंह यांना अटक करणे ही त्यांची प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या मुलींना न्याय मिळावा यासाठी ते हे आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचे कोणी राजकारण करत नाही, असे बजरंग पुनिया म्हणाला. कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली की, 'आम्ही सुरुवातीपासूनच ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेची मागणी करत आहोत. मात्र सरकार त्यांना अटक करत नाही. अशा परिस्थितीत ते बाहेर राहिल्यास कुस्तीपटूंवर दबाव निर्माण होईल.'

खोट्या बातम्या न चालवण्याचे आवाहन : यावेळी बजरंग पुनिया म्हणाला की, मी मीडियाला हात जोडून विनंती करतो की, जर तुम्ही सत्य दाखवू शकत नसाल तर खोटे दाखवू नका. दिल्ली पोलिसांनी एका महिला कुस्तीपटूला ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या घरी नेले होते. ती तिथे बसलेली असताना, तिच्यावर किती मानसिक दडपण येत असेल याची तुम्ही कल्पना करू शकता, असे तो म्हणाला.

खाप पंचायतीचा आंदोलनाला पाठिंबा : सोनीपत येथील कुस्तीपटूंच्या महापंचायतीत खत्री खापचे प्रमुख राजेंद्र खत्री यांनी मंचावरून घोषणा केली की, कुस्तीपटूंनी सर्व मुद्दे आमच्यासमोर ठेवले असून आम्ही कुस्तीपटूंच्या पाठीशी आहोत. 15 जूनपर्यंत शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. 15 जूनपर्यंत सरकारने आरोपी ब्रिजभूषण शरणला अटक करण्यासाठी कठोर पावले उचलली नाहीत, तर 16 किंवा 17 तारखेला पैलवान आम्हाला कॉल देतील आणि आम्ही पैलवानांच्या पाठीशी उभे राहू.

हेही वाचा :

  1. Wrestlers Protest : दिल्ली पोलीस महिला कुस्तीपटूसह ब्रिजभूषण सिंह यांच्या निवासस्थानी दाखल
  2. Wrestlers Protest : आंदोलन मागे घेतल्याच्या अफवाबाबत बजरंग पुनियाने केला मोठा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.