ETV Bharat / bharat

Wrestlers Protest : पदक गंगेत विसर्जित करण्याचा कुस्तीपटूंचा निर्णय मागे, सरकारला दिला पाच दिवसांचा अल्टिमेटम - पदक पवित्र गंगेत विसर्जित

खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई होत नसल्याचा निषेध करणाऱ्या कुस्तीपटूंनी अखेर आपली पदके गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय सध्या मागे घेतला आहे. त्यांनी केंद्र सरकारला पाच दिवसांचा अल्टीमेट देत पदकाचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Wrestlers Protest
Wrestlers Protest
author img

By

Published : May 30, 2023, 6:09 PM IST

Updated : May 30, 2023, 10:17 PM IST

पदक गंगेत विसर्जित करण्याचा कुस्तीपटूचां निर्णय मागे

हरिद्वार : गंगेत पदक विसर्जनासाठी निघालेले कुस्तीपटू उत्तराखंडमध्ये दाखल झाल्या होत्या. खेळाडूंनी आपली पदके हरिद्वार गंगेत विसर्जित करण्याच्या निर्णयाने संपूर्ण देशात वातावरण ढवळून निघाले आहे. यामुळे देशातील राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेस कार्यकर्ते, अनेक सामाजिक संघटना ठिकठिकाणी खेळाडूंची वाट पाहत आहेत. दुसरीकडे, कुस्तीपटू त्यांना वाट्टेल ते करायला मोकळे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

  • #WATCH | Crowd gathers around protesting wrestlers in Haridwar who have come to immerse their medals in river Ganga as a mark of protest against WFI chief and BJP MP Brij Bhushan Sharan Singh over sexual harassment allegations. #WrestlersProtest pic.twitter.com/YhN1oxOFtr

    — ANI (@ANI) May 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पदके गंगेत विसर्जित करण्याची घोषणा : कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर पॉक्सो कायद्यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल झाल्यानंतरही महिला कुस्तीपटू त्यांना अटक न केल्याने आंदोलन करत आहेत. आता त्यांनी आपले पदके गंगेत विसर्जित करण्याची घोषणा केली होती. एवढेच नाही तर कुस्तीपटूं दिल्लीतून पदके घेऊन हरिद्वारमध्ये दाखल देखील झाले होते. मात्र, त्यांनी नंतर आपला निर्णय मागे घेतला आहे.

  • Farmer Leader Naresh Tikait arrives in Haridwar where wrestlers have gathered to immerse their medals in river Ganga as a mark of protest against WFI chief and BJP MP Brij Bhushan Sharan Singh over sexual harassment allegations. He took medals from the wrestlers and sought… pic.twitter.com/41bVOuhXQh

कुस्तीपटू निर्णय घेण्यास स्वतंत्र : हरिद्वारचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अजय सिंह यांनी फोनवर सांगितले की, 'कुस्तीपटू काहीही करण्यास स्वतंत्र आहेत. ते पदक पवित्र गंगेत विसर्जित करण्यासाठी येत असतील तर त्यांना रोखले जाणार नाही. तसेच पैलवानांच्या आगमनाचीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून तशा सूचनाही देण्यात आलेल्या नाहीत.

कुस्तीपटूंना गंगा सभेचा विरोध

हरिद्वारमध्ये सुरू आहे गंगा स्नान : आज हरिद्वारमध्ये गंगा दसरे स्नान सुरू आहे. पहाटे ३ वाजल्यापासूनच या स्नानाला सुरुवात झाली. जो अजूनही चालू आहे. आतापर्यंत 15 लाखांहून अधिक भाविकांनी गंगेत स्नान केले आहे. पदक विजेते, ऑलिम्पियन कुस्तीपटूही हरिद्वारला येत आहेत. अशा स्थितीत त्यांच्या आगमनामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे.

कुस्तीपटूंना गंगा सभेचा विरोध : हरिद्वार गंगा सभेने हर की पाडी येथे कुस्तीपटूंच्या पदकांचे विसर्जन करण्यास विरोध केला आहे. हर की पैडी हे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असल्याचे गंगा सभेचे अध्यक्ष नितीन गौतम यांनी म्हटले आहे. कोणत्याही राजकीय मुद्द्याला महत्त्व देण्याचे कोणतेही कृत्य येथे खपवून घेतले जाणार नाही. पैलवानांकडून करण्यात येत असलेल्या पदक विसर्जनाला विरोध केला जाईल. त्यांना प्रथम गंगा आरतीला बसण्यास सांगितले जाईल. त्यांना प्रत्येक टप्प्यावर असे कृत्य करू नये, अशी विनंती केली जाईल. ते मान्य नसेल तर गंगासभा विरोध करेल.

हेही वाचा - Wrestlers Protest : तर गंगेत आपली पदकांचे करणार अर्पण, कुस्तीपटूंचा निर्धार; दिल्लीगेटवर करणार प्राणांतिक आंदोलन

Last Updated : May 30, 2023, 10:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.