नवी दिल्ली : भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात सुरू असलेल्या लैंगिक छळ प्रकरणाच्या तपासात नवा ट्विस्ट आला आहे. दिल्ली पोलीस ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या महिला कुस्तीपटूला घेऊन त्यांच्या घरी पोहोचली आहे. क्राइम सीन पुन्हा तयार करण्यासाठी पोलिस पोहोचल्याचे बोलले जात आहे.
पीडित महिला कुस्तीपटूचे जबाब जुळवणार : खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर एका महिला कुस्तीपटूने त्यांच्या राहत्या घरी विनयभंग केल्याचा आरोप केला होता. पोलीस या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. सोबतच पोलीस पीडित महिला कुस्तीपटूचे जबाबही जुळवणार आहेत. सध्या ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या निवासस्थानाबाहेर प्रसारमाध्यमांचा मेळा जमा झाला असून, आतमध्ये कोणत्याही व्यक्तीला किंवा मीडियाकर्मीला प्रवेश देण्यात आलेला नाही.
15 जूनपर्यंत न्यायालयात अहवाल सादर केला जाईल : तत्पूर्वी, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर, कुस्तीपटूंनी त्यांचे आंदोलन 15 जूनपर्यंत स्थगित केले आहे. दुसरीकडे दिल्ली पोलिसांनीही तपासाला गती दिली आहे. दिल्ली पोलिसांना या प्रकरणाचा अहवाल 15 जूनपर्यंत न्यायालयात सादर करायचा आहे. या प्रकरणी पोलिस आरोपपत्र दाखल करणार की अंतिम अहवाल दाखल करणार हेही ठरलेले नाही.
आंदोलन 15 जूनपर्यंत स्थगित : क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी पीडित महिला कुस्तीपटूंची भेट घेतल्यानंतर त्यांना त्यांचे आंदोलन 15 जूनपर्यंत पुढे ढकलण्यास सांगितले होते. यासोबतच पोलीस त्यांचा तपास अहवाल 15 जूनपर्यंत न्यायालयात सादर करतील, असे आश्वासनही देण्यात आले. यानंतर महिला खेळाडूंनी 15 जूनपर्यंत आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली होती.
कुस्तीपटू आक्षेपार्ह घोषणाबाजी करताना आढळले नाहीत : पंतप्रधान मोदी आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात, दिल्ली पोलिसांनी कोर्टात आपला अहवाल सादर केला आहे. अहवालात म्हटले आहे की, क्लिपमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट कुठलीही आक्षेपार्ह घोषणाबाजी करताना आढळले नाहीत. त्यामुळे अर्ज फेटाळण्यात यावा. या आधी तक्रारदार महाराज नौहटिया यांनी न्यायालयात क्लिप सुपूर्द करताना कुस्तीपटूंनी पंतप्रधान मोदी आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्याची तक्रार केली होती.
हेही वाचा :