ETV Bharat / bharat

Wrestlers Protest : आशियाई चॅम्पियनशिपची तयारी, आंदोलक कुस्तीपटू सरावासाठी परतले

आशियाई चॅम्पियनशिप आणि आगामी स्पर्धांच्या तयारीसाठी कुस्तीपटू सोनीपत येथील साई सेंटरमध्ये पोहोचले आहेत. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) सर्व क्रीडा महासंघांना 30 जूनपर्यंत खेळाडूंची यादी देण्यास सांगितले आहे.

Wrestlers Protest
कुस्तीपटूंचे आंदोलन
author img

By

Published : Jun 21, 2023, 5:23 PM IST

सोनीपत : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करत आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी आशियाई चॅम्पियनशिप आणि आगामी स्पर्धांसाठी सराव सुरू केला आहे. बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि संगीता फोगट यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी सोनीपत येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात प्रशिक्षण सुरू केले आहे. विनेश फोगट ही 9 जून रोजीच साई सेंटरमध्ये सरावासाठी आली होती.

काय आहे संपूर्ण प्रकरण? : भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत अनेक कुस्तीपटू जानेवारीमध्ये पहिल्यांदा धरण्यावर बसले होते. त्यानंतर मार्चमध्ये कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करत जंतरमंतरवर मोर्चा उघडला. ब्रिजभूषण शरण यांना अद्याप अटक झाली नसली तरी दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर विनयभंग आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी यासंबंधीचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. त्याच वेळी, ब्रिजभूषण शरण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या अल्पवयीन कुस्तीपटूने तक्रार मागे घेतली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत कोर्टातून एफआयआर रद्द केला.

पैलवान सरावासाठी परतले : सध्या कुस्तीपटू आगामी स्पर्धांच्या सरावासाठी परतले आहेत. कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह विरुद्ध आघाडी उघडली आहे. मात्र, आशियाई चॅम्पियनशिप, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिक स्पर्धा येत्या वर्षभरात होणार आहेत. त्यामुळे आता सोनीपतच्या बहलगडमध्ये असलेल्या साई सेंटरमध्ये सर्व पैलवान सकाळ-संध्याकाळ घाम गाळत आहेत.

कुस्तीपटूंची नावे देण्यासाठी 10 ऑगस्टपर्यंत वेळ मागितला : : भारतीय ऑलिम्पिक संघटनेने 30 जूनपर्यंत सर्व क्रीडा महासंघांकडून खेळाडूंची यादी मागवली आहे. IOA ला 15 जुलैपर्यंत सर्व सहभागी भारतीय खेळाडूंची नावे ऑलिम्पिक कौन्सिलकडे (OCA) पाठवावी लागतील. मात्र, आयओएने कुस्तीपटूंसाठी ओसीएकडून 10 ऑगस्टपर्यंत वेळ मागितला आहे. त्याचबरोबर ऑगस्टमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चाचण्या घेण्याची मागणी कुस्तीपटूंनी क्रीडा मंत्रालयाकडे केली आहे.

हेही वाचा :

  1. Wrestlers Protest : विनेश शस्त्र उचलण्याबद्दल का बोलली? कोणाला म्हणाली आंधळा, मुका आणि बहिरा राजा?, जाणून घ्या
  2. Wrestlers Protest : साक्षी मलिक, बबिता फोगटमध्ये ट्विटरवॉर, साक्षी मलिककवर गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.