ETV Bharat / bharat

Wrestler Protest In Delhi : कुस्तीपटूंना न्याय मिळेल का, दिग्गज खेळाडूंचा सवाल, प्रियंका गांधीही आंदोलकांना भेटल्या - कुस्तीपटू

भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ब्रिजभूषण सिंह यांना अटक करुन बडतर्फ करण्याची मागणी खेळाडू करत आहेत.

Wrestler Protest In Delhi
आंदोलक कुस्तीपटू
author img

By

Published : Apr 29, 2023, 7:25 AM IST

Updated : Apr 29, 2023, 9:29 AM IST

दिल्ली : कुस्तीपटू आणि कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यातील वाद आता चिघळला आहे. त्यामुळे भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाला हे चांगले झाले असले तरी, गुन्हा दाखल झाल्यामुळे आम्हाला न्याय मिळेल का, असा सवाल दिग्गज खेळाडूंनी केला आहे. त्यामुळे ब्रिजभूषण सिंह यांना अटक करुन बडतर्फ करण्याच्या मागणीवर खेळाडू ठाम असल्याचे दिसून येते.

  • #WATCH | "I don't have any expectations from the PM, because if he is worried about these wrestlers, then why has he not talked to them or met them yet. Why the govt is trying to save him (Brij Bhushan Sharan Singh...," says Congress leader Priyanka Gandhi Vadra in Delhi pic.twitter.com/XLDpIruQHv

    — ANI (@ANI) April 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रियंका गांधी यांनी घेतली भेट - आज सकाळी आंदोलनस्थळी जाऊन काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आंदोलकांची भेट घेतली. तसेच त्यांची विचारपूस केली. या प्रकरणात पंतप्रधान किंवा सरकारकडून आपल्याला काहीही अपेक्षा नाही असे प्रक्षुब्ध उद्गार त्यांनी काढले. जर त्यांना काही वाटत असले असते तर त्यांनी आंदोलकांची भेट घेतली असती, तसेच कारवाईचे आदेश दिले असते असे प्रियंका म्हणाल्या.

  • Podium से फुटपाथ तक।

    आधी रात खुले आसमान के नीचे न्याय की आस में। pic.twitter.com/rgaVTM5WGK

    — Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) April 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कागदावरची लढाई सुरू झाली : ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटू दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलनाला बसले आहेत. कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतल्याने ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या अगोदरच ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. मात्र तेव्हा कुस्तीपटूंच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता ब्रिजभूषण यांच्याविोरधात गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी यातून आम्हाला न्याय मिळणार आहे का असा सवाल कुस्तीपटू सत्यव्रत कडीयानने विचारला आहे. आता आमची कागदावरची लढाई सुरू झाली आहे. आमच्या प्रशिक्षकांचे काय मत आहे, ते विचारात घेऊन आम्ही पुढची दिशा ठरवणार असल्याची माहितीही त्याने दिली आहे.

  • Delhi | It is good that FIR has been registered. What will we get from the FIR? Will FIR get us justice? Delhi Police should have lodged an FIR on the very first day. Our on-paper fight has just started. Let's see what our legal team & coaches have to say. We are demanding that… pic.twitter.com/Wky5Llo7HD

न्यायासाठी खेळाडूंचा रात्रभर रस्त्यावर मुक्काम : भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात खेळाडूंनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. खेळाडू रात्रभर रस्त्यावरच आंदोलस्थळी झोपत आहेत. त्यामुळे देशभरातून या खेळाडूंना सहानुभूती मिळत आहे. विनेश फोगाटने शुक्रवारी मध्यरात्रीचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोला विनेशने न्यायासाठी पोडीयममधून फुटपाथवर असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे कुस्तीपटूंच्या आंदोलनाची तिव्रता लक्षात येते.

  • #WATCH | Police said that if you want to protest, sleep on the road. What kind of pressure has come on them today, there was no such problem before, this has happened only because of the pressure of the Supreme Court: Wrestler Bajrang Punia on registering FIR against WFI chief… pic.twitter.com/XpeVtQJMZ9

पीटी उषावर सगळीकडून टीका : कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरू केल्यामुळे पीटी उषाने नाराजी व्यक्त केली होती. मात्र खेळाडूंच्या आंदोलनामुळे देशाची नाचक्की होत असल्याचे पीटी उषाने प्रतिक्रिया दिली होती. मात्र पीटी उषाच्या या प्रतिक्रियेनंतर खेळाडूंनी पीटी उषावर चांगलाच पलटवार केला आहे.

  • #WATCH | "I have not yet received the FIR copy. I will speak once I've received the FIR copy," says Brijbhushan Sharan Singh, President, Wrestling Federation of India on wrestlers' protest against him and FIRs registered by Delhi police pic.twitter.com/FvU1FxkI35

सिंह यांनी एफआयआर झाल्यानंतर दुसरी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की त्यांच्याकडे एफआयआरची प्रत मिळालेली नाही. तसेच ज्यावेळी गुन्हा दाखल झाल्याची प्रत मिळेल त्यावेळी बोलू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा - Wrestlers Protest : ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हे दाखल; म्हणाले, 'कुठल्याही चौकशीसाठी तयार'

Last Updated : Apr 29, 2023, 9:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.