बागडोगरा (प.बंगाल) : सिक्कीमच्या जेमा येथे (Sikkim Army Accident) दोन दिवसांपूर्वी झालेल्या रस्ते अपघातात प्राण गमावलेल्या 16 लष्करी जवानांचे पार्थिव पश्चिम बंगालमधील बागडोगरा विमानतळावर (bagdogra airport in West Bengal) पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्यांच्या घरी पाठवण्यात आले. (wreaths laid on dead body of 16 jawans). पुष्पहार अर्पण समारंभानंतर, 15 मृतदेह हवाई दलाच्या विशेष विमानांद्वारे देशातील विविध विमानतळांवर पाठविण्यात आले. तेथून ते जवानांच्या मूळ गावी नेले जातील. बिहारमधील खगरिया जिल्ह्यातील नायब सुभेदार चंदनकुमार मिश्रा यांचा मृतदेह रस्ते मार्गाने त्यांच्या मूळ गावी नेण्यात आला.
शहीद जवानांना बंदुकीची सलामी : अपघातात प्राण गमावलेल्या 16 लष्करी जवानांचे पार्थिव दुपारी 12.30 वाजता बागडोगरा विमानतळावर आणण्यात आले, त्यानंतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मृत सैनिकांच्या निवासस्थानी पार्थिव पोहोचल्यानंतर स्थानिक सैन्य अधिकारी त्यांना कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यासाठी समन्वय साधतील आणि पूर्ण लष्करी सन्मानाने अंतिम संस्कार केले जातील. यावेळी शहीद जवानांना बंदुकीची सलामी देण्यात आली. सिक्कीमचे राज्यपाल गंगा प्रसाद, मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग, जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) त्रिशक्ती कॉर्प्स लेफ्टनंट जनरल व्हीपीएस कौशिक आणि लष्कर आणि हवाई दलाच्या इतर अधिकाऱ्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नागरी प्रशासन आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात उपस्थित होते. लष्कराच्या वाहनातून मृतदेह गंगटोकजवळ सोचथांग येथे आणण्यात आले होते.
-
A wreath-laying ceremony for Indian Army soldiers who lost their lives in a road accident in Sikkim yesterday held at Bagdogra Airport in West Bengal pic.twitter.com/2XliBmVuPW
— ANI (@ANI) December 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A wreath-laying ceremony for Indian Army soldiers who lost their lives in a road accident in Sikkim yesterday held at Bagdogra Airport in West Bengal pic.twitter.com/2XliBmVuPW
— ANI (@ANI) December 24, 2022A wreath-laying ceremony for Indian Army soldiers who lost their lives in a road accident in Sikkim yesterday held at Bagdogra Airport in West Bengal pic.twitter.com/2XliBmVuPW
— ANI (@ANI) December 24, 2022
जखमी जवानांना सिलीगुडीला हलवले : लष्कराच्या निवेदनानुसार, सिक्किमच्या जेमा येथे एका तीव्र वळणावर वाहन रस्त्यावरून घसरल्याने तीन कनिष्ठ आयुक्त अधिकाऱ्यांसह 16 लष्करी जवानांना जीव गमवावा लागला. अपघातानंतर तात्काळ बचाव मोहीम सुरू करण्यात आली आणि चार जखमी जवानांना विमानाने सिलीगुडीला हलवण्यात आले. त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात शहीद झालेल्या जवानांमध्ये नायब सुभेदार चंदन कुमार मिश्रा आणि 285 मेडिकल रेजिमेंटचे नायब सुभेदार ओंकार सिंग, लेफ्टनंट हवालदार गोपीनाथ माकुर, शिपाई सुखा राम, हवालदार चरण सिंग आणि 26 वर्षीय नाईक रविंदर सिंग थापा यांचा समावेश आहे.
या जवानांचा मृत्यू : मिश्रा हे बिहारमधील खगरियाचे, ओंकार सिंग हे पंजाबमधील पठाणकोटचे, मकूर हे पश्चिम बंगालमधील बांकुरा येथील, सुखा राम राजस्थानमधील जोधपूरचे, चरण सिंग उत्तर प्रदेशातील लखनऊचे आणि थापा हे उत्तराखंडमधील पंतनगरचे रहिवाची होते. सैन्याने सांगितले की मृतांमध्ये 221 फील्ड रेजिमेंटचे नाईक वैशाख एस आणि नाईक प्रमोद सिंग यांचा समावेश आहे, तर 25 ग्रेनेडियर्सचे चार सैनिक - लेफ्टनंट नाईक भूपेंद्र सिंग, नाईक श्याम सिंग यादव, नाईक लोकेश कुमार आणि ग्रेनेडियर विकास कुमार यांचाही अपघातात मृत्यू झाला. तर इतर जवानांमथ्ये, वैशाख केरळमधील पलक्कड येथील, प्रमोद सिंग बिहारमधील आरा, भूपेंद्र सिंग उत्तर प्रदेशातील एटा, यादव उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील, लोकेश उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील आणि विकास कुमार हरियाणातील फतेहाबाद येथील होते. सैन्याने सांगितले की, 8 राजस्थान रायफल्सचे सुभेदार गुमान सिंग आणि लेफ्टनंट हवालदार अरविंद सिंग, 113 इंजिनियर रेजिमेंटचे लेफ्टनंट नाईक सोंबीर सिंग आणि 1871 फील्ड रेजिमेंटचे लेफ्टनंट नाईक मनोज कुमार यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या सैनिकांमध्ये समावेश आहे. गुमान सिंग हे राजस्थानमधील जैसलमेरचे, अरविंद सिंग हरियाणातील भिवानीचे, सोंबीर सिंग हरियाणातील हिस्सारचे आणि मनोज कुमार हे राजस्थानमधील झुंझुनूचे होते.