ETV Bharat / bharat

Bijuli Prasad : राजेशाही थाट असलेल्या जगातील सर्वात वयोवृद्ध आशियाई हत्तीचे निधन, 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

author img

By

Published : Aug 21, 2023, 3:57 PM IST

Updated : Aug 21, 2023, 4:15 PM IST

'बिजुली प्रसाद' या जगातील सर्वात वयोवृद्ध आशियाई हत्तीचा गौरवशाली कालखंड संपुष्टात आलाय. या हत्तीने सोमवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. 'बिजुली प्रसाद' हा भारतातील ब्रिटिश साम्राज्याचा साक्षीदार होता.

Bijuli Prasad
बिजुली प्रसाद

विश्वनाथ (आसाम) : जगात भारताची ओळख 'हत्तींचा देश' अशी आहे. हत्तीला इंद्राचे वाहन म्हटले जाते. त्यामुळे भारतात हत्तीला देवासमान दर्जा आहे. पूर्वीच्या काळी भारतीय राजे आपल्या पदरी 'शाही' हत्ती ठेवत असतं. ते त्यांच्या वैभवाचे प्रतिक मानले जात असे. इंग्रजांनाही भारतीय हत्तींचे विशेष कुतूहल होते. आता अशाच एका इंग्रजकालीन शाही हत्तीचे निधन झाले आहे. जगातील सर्वात वयोवृद्ध आशियाई हत्ती 'बिजुली प्रसाद' चे सोमवारी निधन झाले. मृत्यूच्यावेळी या हत्तीचे वय तब्बल 90 वर्षे होते. विशेष म्हणजे, एकेकाळी या हत्तीला ब्रिटिशांचे शाही आदरातिथ्य मिळाले होते.

Elephant
बिजुली प्रसाद

ब्रिटिश साम्राज्याचा साक्षीदार होता : 'बिजुली प्रसाद' हा हत्ती आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातल्या बेहाली चहाच्या मळ्यात राहत होता. तो भारतातील ब्रिटिश साम्राज्याचा साक्षीदार होता. अगदी आजपर्यंत इंग्रज 'बिजुली प्रसाद'ची नोंद ठेवत होते. या आधी बिजुलीला विश्वनाथमधील बारगाव चहाच्या मळ्यात ठेवण्यात आले होते. परंतु नंतर त्याला बेहाली चहाच्या मळ्यात आणण्यात आले.

Elephant
बिजुली प्रसाद

विल्यमसन मॅगोर टी कंपनीने विकत घेतला होता : सुमारे 86 वर्षांपूर्वी विल्यमसन मॅगोर टी कंपनीने एक हत्ती विकत घेतला होता. इंग्रजांच्या ऑलिव्हर साहेबांनी त्या हत्तीचे नाव 'बिजुली प्रसाद' ठेवले. मॅगोर कंपनीच्या कुटुंबातील सदस्य बनलेला 'बिजुली' एकेकाळी कंपनीच्या अभिजाततेचे प्रतीक बनला होता. बिजुलीच्या आहारात दररोज २५ किलो तांदूळ, तितकेच कॉर्न आणि सेसी बीन यांचा समावेश होता. यासह 'बिजुली प्रसाद'ला केळींचा देखील नियमित खुराक दिला जायचा.

Elephant
बिजुली प्रसाद

देखभालीसाठी वर्षाला ६ लाख रुपये खर्च : बिजुली प्रसादची काळजी घेण्यासाठी इंग्रजांच्या मिस्टर ऑलिव्हरने अनेक कर्मचारी नेमले होते. दर आठवड्याला, बिजुली प्रसादच्या शरीराचे वजन तपासले जायचे. नियमित आरोग्य तपासणीनंतर अहवाल कोलकात्याला पाठवला जायचा. बिजुली प्रसादच्या देखभालीसाठी वर्षाला ६ लाख रुपये खर्च येत असे. चहा कंपनीच हा सर्व खर्च करत असे.

Elephant
बिजुली प्रसाद

सर्वत्र हळहळ व्यक्त : पशुवैद्य डॉ. कुशल कोंवर शर्मा यांच्या देखरेखीखाली हत्तीची नियमित आरोग्य तपासणी करण्यात आली. यापूर्वी, कर्नाटकातील 'चामुंडा प्रसाद' या वृद्ध हत्तीचा वयाच्या ८२ व्या वर्षी मृत्यू झाला होता. त्यानंतर 'बिजुली प्रसाद' हा देशातील सर्वात वृद्ध हत्ती बनला होता. आता 'बिजुली प्रसाद'च्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय.

हेही वाचा :

  1. Elephant Attack : हत्तीचा रस्त्यावरील वाहनांवर हल्ला, वन कर्मचाऱ्यांनाही पिटाळले ; Watch Video
  2. Elephants Cross Brahmaputra River : अन्नाच्या शोधात जंगली हत्तींनी पार केली धो-धो वाहणारी ब्रह्मपुत्रा नदी, पहा व्हिडिओ
  3. World Elephant Day : जागतिक हत्ती दिन 2023; कधी आणि कोणत्या उद्देशाने साजरा करण्यात आला हा दिवस घ्या जाणून...

Last Updated : Aug 21, 2023, 4:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.