हा दिवस अशा लोकांच्या प्रोत्साहनासाठी साजरा केला जातो जे मानव आणि प्राण्यांसाठी रात्रंदिवस काम करत आहेत. त्यांच्या सन्मानार्थ जगभरात 'जागतिक एनजीओ दिन' साजरा केला जातो. आज या दिवसाच्या निमित्ताने त्यांच्याशी संबंधित काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊया…
जागतिक एनजीओ दिनाचा इतिहास : 2010 मध्ये, बाल्टिक समुद्र राज्ये, बाल्टिक सी एनजीओ फोरमचे सदस्य आणि कौन्सिलच्या अधिकृत सदस्यांनी अधिकृतपणे जागतिक एनजीओ दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. जे नंतर 27 फेब्रुवारी 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने घोषित केले. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी २७ फेब्रुवारीला हा दिवस जगभरात साजरा केला जातो.
जागतिक 'एनजीओ' दिवस का साजरा केला जातो : समाजासाठी योगदान देणाऱ्या संस्थाचा सन्मान व्हावा, या उद्देशाने जागतिक स्वयंसेवी संस्था दिवस साजरा केला जातो. यामध्ये ना-नफा, ना-तोटा या तत्वावर संस्था काम करत असतात. त्याचबरोबर जगभरातील स्वयंसेवी संस्थांच्या कामगिरी आणि यशावर प्रकाश टाकणे, समाजातील स्वयंसेवी संस्थांची भूमिका नागरीकांना समजावून सांगणे. जगभरातील चांगल्या हेतूसाठी कार्य केलेल्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
'हा' उद्देश आहे : या दिवसाचा एक विशेष उद्देश आहे, खरे तर त्या सर्व लोकांची ओळख करून देणे हा आहे जे लोक आणि प्राण्यांची निःस्वार्थपणे सेवा करतात आणि त्यांचा सन्मान करतात, म्हणून हा दिवस खास अशा लोकांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो जे एक किंवा दुसऱ्या एनजीओद्वारे लोकांना आणि प्राण्यांना मदत करतात. बाल्टिक सी एनजीओ फोरममध्ये डेन्मार्क, एस्टोनिया, फिनलंड, जर्मनी, आइसलँड, लॅटव्हिया, लिथुआनिया, पोलंड, रशिया, नॉर्वे आणि स्वीडन सारखे सदस्य देश आहेत. बाल्टिक सी एनजीओ फोरम ऑफ द कौन्सिल ऑफ बाल्टिक सी स्टेटने २७ एप्रिल २०१४ रोजी अधिकृतपणे या दिवसाला मान्यता दिली. १७ एप्रिल, २०१० साली या दिवसाची घोषणा करण्यात आली. मात्र २७ एप्रिल २०१४ रोजी याला अधिकृतपणे मान्यता मिळाली. या दिवसाला 'आंतरराष्ट्रीय कॅलेंडर दिवस' असे ही म्हटले जाते.
कोणत्या संस्था काम करतात : समाजासाठी योगदान देणाऱ्या संस्थामध्ये दोन प्रकारच्या संस्था असतात. एक सरकारी आणि दुसरी अशासकीय. १८ व्या शतकापासून अशासकीय सरकारी संस्था अस्तित्वात आहेत. संयुक्त राष्ट्राच्या चार्टरच्या कलम ७१ नुसार १९४५ मध्येच अशासकीय हा शब्द अस्तित्वात आला. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार दोन प्रकारच्या अशासकीय संस्था असतात. एक ऑपरेशनल आणि दुसरी ॲडव्होकेसी ऑपरेशनलचे मुख्य काम म्हणजे विकास उपक्रम तयार करणे आणि वितरित करणे होय.
काय काम करतात या संस्था : जगभरातील संस्था या अन्न, आरोग्य, रोजगार, शिक्षण, महिला सबलीकरण, मानव हक्क यावर काम करत असतात. तर देशातंर्गत अनाथश्रम, कचरावेचक महिलांचे सक्षमीकरण, कुष्ठरोगांसाठी काम करणाऱ्या संस्था, निराधार लोकांसाठी काम करतात. विशेष मुलांसाठी, पाणी वाचवण्यासाठी, एखाद्या विशेष भागाचा विकास करावा यासाठीही या संस्था काम करत असतात. समाजातील अनेक प्रश्नावर या संस्था प्रकाशझोत टाकत असतात.