ETV Bharat / bharat

Pm Narendra Modi In G20 : जग भारतीय अर्थव्यवस्थेकडं मोठ्या विश्वासानं पाहते - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी 20 गटाच्या व्यापार आणि गुंतवणूक मंत्र्यांच्या बैठकीला आभासी पद्धतीनं संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जग भारताकडं मोठ्या विश्वासानं पाहात असल्याचं स्पष्ट केलं.

Pm Narendra Modi In G20
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2023, 3:07 PM IST

जयपूर : भारतीय अर्थव्यवस्थेनं गेल्या नऊ वर्षात मोठी झेप घेत जगातील पाचवी अर्थव्यवस्था होण्याचा बहुमान पटकावला आहे. त्यामुळे भारतात स्पर्धा आणि पारदर्शकता चांगलीच वाढली आहे. भारतात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळेच जग भारताकडं मोठ्या आत्मविश्वासानं पाहत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. जी20 च्या व्यापार आणि गुंतवणूक मंत्र्यांच्या बैठकीला आभासी पद्धतीनं संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.

भारतानं केला डिजिटायझेशनचा विस्तार : भारतानं डिजिटायझेशनचा विस्तार केला असून त्यामुळे नवनिर्मितीला चालना दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं. आम्ही रेड टेपवरुन रेड कार्पेटवर आल्याचंही त्यांनी सांगितलं. थेट परकीय गुंतवणुकीत आम्ही धोरणात्मक स्थिरता आणली आहे. येत्या काही वर्षात भारताला तिसरी जागतिक अर्थव्यवस्था बनवण्याचा आमचा निर्धार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. जागतिक अनिश्चिततेनं जागतिक अर्थव्यवस्थेची परीक्षा घेतली आहे. त्यामुळे G20 चा सदस्य या नात्यानं आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं ही देशाची जबाबदारी असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

ई कॉमर्स वाढीसाठी एकत्र काम करण्याची गरज : देशात ई कॉमर्सला चालना देण्याची गरज आहे. सध्या अनेक साईटवरुन व्यवसाय करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसमावेशक जागतिक मूल्य साखळी तयार करण्याची गरज आहे. भविष्यात उद्भवू शकणार्‍या आव्हानांना आपण तोंड देण्यासाठी समर्थ होऊ. जागतिक मूल्य साखळीसाठी समान फ्रेमवर्क तयार करण्याचा भारताचा प्रस्ताव आहे. ई कॉमर्सच्या वाढीसाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना पाठिंबा : जागतिक व्यापार अधिक सर्वसमावेशक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपण एकत्र काम कराल, असा मला विश्वास असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना जास्तीत जास्त पाठिंबा देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा -

  1. Eknath Shinde Nap : मोदींच्या भाषणावेळी मुख्यमंत्र्यांची ब्रह्मानंदी टाळी?, Video Viral
  2. BJP Holds Crucial Meeting : भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक, आगामी निवडणुकीचा घेणार आढावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.