ETV Bharat / bharat

World Day Of Social Justice : 'जागतिक सामाजिक न्याय दिन' का साजरा केला जातो?, काय आहे पार्श्वभूमी, जाणून घ्या सविस्तर - २० फेब्रुवारी

जागतिक स्तरावर २० फेब्रुवारी हा 'जागतिक सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरा केला जातो. याची सुरुवात 2009 मध्ये झाली. तेव्हापासून समाजाला वाळवीसारखे पोकळ बनवणारी सामाजिक दुष्कृत्ये, भेदभाव आणि विषमता संपविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

World Day Of Social Justice
जागतिक सामाजिक न्याय दिन
author img

By

Published : Feb 6, 2023, 3:00 PM IST

Updated : Feb 20, 2023, 6:15 AM IST

मानवी हक्क आणि जगात पसरलेली असमानता यांच्यामध्ये समाजातील संधी आणि विशेषाधिकारांच्या वितरणात न्याय प्रस्थापित करणे, हे सामाजिक न्यायाच्या कक्षेत येते. लोकांना सामाजिक न्यायाच्या महत्त्वाची जाणीव करून देण्यासाठी, संयुक्त राष्ट्रसंघ दरवर्षी 20 फेब्रुवारी रोजी 'जागतिक सामाजिक न्याय दिवस' साजरा करते.

प्रयत्नांना गती देणे आवश्यक : सत्य हे आहे की, आपण अजूनही सामाजिक न्यायाशी संबंधित असलेल्या लक्ष्यित उद्दिष्टापासून खूप दूर आहोत. समाजातील प्रत्येक घटकातील प्रत्येक व्यक्ती भय, शोषण, अन्याय, भेदभाव यापासून मुक्त होईल, तेव्हा सामाजिक न्यायाच्या संकल्पनेचे वास्तवात रूपांतर होईल. त्याला चांगली उपजीविका आणि सामाजिक सुरक्षा मिळेल. हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा आपण समाजाला प्रेरणा देण्यासाठी आपल्या सामूहिक आणि वैयक्तिक प्रयत्नांना गती देऊ.

सामाजिक न्याय काय आहे : आधुनिक समाजात सर्व लोकांना समान संधी आणि सुविधा मिळायला हव्यात, हा केवळ सामाजिक न्यायाचाच नव्हे तर, सर्व देशांचा आदर्श आहे. सामाजिक न्यायाचे ध्येय हे सुनिश्चित करणे आहे की, सर्व लोक त्यांच्या सामाजिक भूमिका पार पाडू शकतील आणि समाजाकडून ते पात्र आहेत. यासाठी समाजातील विविध संस्थांना अधिकार व कर्तव्ये दिली जातात जेणेकरून ही उद्दिष्टे साध्य करता येतील.

कधीपासून साजरा केला जातो 'हा' दिवस : 26 नोव्हेंबर 2007 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने जाहीर केले की, दरवर्षी 20 फेब्रुवारी हा 'जागतिक सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरा केला जाईल. मानवतेला धोका निर्माण करणाऱ्या समस्येचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने या दिवसाची सुरुवात केली. समतेचा प्रसार करताना अन्याय आणि भेदभाव नष्ट करणे, हा त्याचा उद्देश आहे.

'हा' दिन साजरा करण्यामागे काय आहे उद्देश : मानवतेला धोका निर्माण करणाऱ्या समस्येचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 'जागतिक सामाजिक न्याय दिन' या दिवसाची सुरुवात केली. समतेचा प्रसार करताना अन्याय आणि भेदभाव नष्ट करणे, हा त्याचा उद्देश आहे. याबाबत आपण समाजाला प्रेरणा देण्यासाठी आपल्या सामूहिक आणि वैयक्तिक प्रयत्नांना गती वाढवायला हवी.

2023 ची थीम : 2022 च्या जागतिक सामाजिक न्याय दिनाची थीम 'औपचारिक रोजगाराद्वारे सामाजिक न्याय मिळवणे' ही होती. तर 2021 च्या जागतिक सामाजिक न्याय दिनाची थीम 'डिजीटल अर्थव्यवस्थेतील सामाजिक न्यायासाठी आवाहन' ही होती. 2023 ची थीम अद्याप ठरलेली नाही, नजीकच्या भविष्यात निवडली जाईल.

हेही वाचा : Why Valentine Day Celebrated : व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो? तुम्हाला क्वचितच माहित असेल हा इतिहास

Last Updated : Feb 20, 2023, 6:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.