हैद्राबाद : पृथ्वीवरील सर्वात मेहनती प्राणी म्हणजे इतर कोणी नसून मधमाश्या आहेत. ज्या पर्यावरण, प्राणी आणि वनस्पतींना फायदा करून देत आहेत. मधमाशी आणि मानवचा संबंध फार आधीपासून आहे. जागतिक मधमाशी दिन हा 20 मे 2018 पासून साजरा केला जातो. जागतिक मधमाशी दिनाची तारीख 20 मे म्हणून निवडण्यात आली, कारण या दिवशी स्लोव्हेनियामधील मधमाशीपालन करणाऱ्या कुटुंबातील अग्रगण्य अँटोन जानसा यांचा जन्म झाला. तसेच अग्रगण्य अँटोन यांच्या कुटुंबाची मधमाश्या पालण करण्याची परंपरा होती. त्यामुळे अग्रगण्य अँटो हे देखील मधमाश्या पालण करत होते. मधमाश्याचे पाळण हे जास्त प्रमाणात स्लोवेनिया या देशात केले जाते. मधमाश्या पाळण्याच्या बाबतीत स्लोवेनिया हा आघाडीचा देश आहे. हा देश युरोपीय देशांपैकी एक आहे. मधमाश्याना सर्वाधित आकर्षक परागकण वाटतो. त्या एका फुलातून दुसऱ्या फुलावर परागकण वाहून नेतात, तसेच परागकण एका जागेवरून दुसऱ्या फुलाकडे नेल्यास कृषी उत्पादन वाढ होते. फळाच्या झाडाला जी फुले लागतात ती काही काळानंतर फळे ही मधमाश्यामुळे बनतात. तसेच फुलांच्या झाडांना कळी फुलवायची असेल तर मधमाशी तिला फुलविण्याचे काम करते. मधमाशी ही मानवाच्या जीवनात फार मोठे काम करते. तसेच शेतकरी देखील त्यांच्या पिकांचे परागीकरण करण्यासाठी मधमाशांवर अवलंबून असतात.
अन्न जाळ्यात मधमाशांचे महत्त्व : मधमाश्या आपल्याला फक्त अन्नच पुरवत नाहीत तर इतर प्राणी आणि पक्ष्यांनी खाल्लेल्या अन्नाचे परागीकरणही करतात. अशा प्रकारे, विविध प्राण्यांसाठी अन्न पुरवठ्याचा प्रवाहाचे काम मधमाशी करते. तसेच मधमाश्या या इकोसिस्टमसाठी फायदेशीर असतात कारण त्या जंगलातील रानफुले, झाडे, औषधी वनस्पती आणि झुडुपे यांचे परागीकरण करतात, त्यामुळे वनस्पतींची जैवविविधता वाढते आणि त्यामुळे पृथ्वीचे सौंदर्यही वाढते. याव्यतिरिक्त मधमाश्या या शहरांतील उद्यानाचे सौंदर्य वाढवितात.
मधमाश्यांचे प्रकार! : निसर्गाच्या फायद्यासाठी मधमाशींचे विविध प्रजाती या पृथ्वीवर अस्थित्वात आहे. जगभरात सुमारे 20,000 मधमाश्यांच्या प्रजाती आहेत. मधमाश्या सहसा वसाहतींमध्ये राहतात, परंतु काही एकट्या असतात. तसेच मधमाश्या या मोठ्या वसाहतींमध्ये साधारणतः 50,000 - 60,000 संख्येत राहतात. या दिवसरात्र काम करत असतात. मधमाश्या या जास्त प्रमाणात मध उत्पादन करतात.
बंबल-बी मधमाशी : बंबलबी साधारणपणे 50 ते 400 संख्येत छोट्या वसाहतींमध्ये राहतात. बंबलबी हे जंगली आणि लागवड केलेल्या वनस्पतींचे परागकण वाहून नेतात. या थंड तापमानात राहतात आणि उच्च उंचीवर उडतात, त्यामुळे या आदर्श परागकण बनतात.
गवंडी मधमाश्या : या मधमाश्या एकाकी असतात आणि गुंजन आवाज करतात. ते उत्कृष्ट परागकण बनवितात. भौंमापेक्षा 120 पट अधिक कार्यक्षम असतात. गवंडी मधमाश्या या पोळ्यांमध्ये राहत नाहीत.
सुतार मधमाश्या : सुतार मधमाश्या एकाकी असतात आणि त्यांची ती घरटी जमिनीत बांधतात. ते उच्च तापमान देखील सहन करू शकतात आणि या कमी प्रकाशात फार सक्रिय होऊ शकतात. या मधमाश्याची अशी वैशिष्ट्ये आहे की, या हरितगृह पिके आणि रात्री-फुलणारी पिके यांमध्ये अविश्वसनीय काम करतात.
मधमाश्या धोक्यात का आहेत? : वाढत्या प्रदुषणामुळे आणि आणि शहरीकरणमुळे हवामान हे उबदार बनत आहे. जलद गतिने बर्फ वितळणे आणि अनेक ठिक-ठिकाणी दुष्काळ पडणे असा प्रकार दिसत आहे. त्यामुळे झाडांची संख्या फार कमी होत आहे. यामुळेच मधमाश्यांचे अस्थित्व हे घोक्यात आले आहे. दुर्दैवाने, रोग, जिवाणू संसर्ग आणि परजीवीमुळे दरवर्षी मोठ्या संख्येने मधमाश्या मरत आहेत. मधमाश्यांच्या अधिक प्रजाती मरत असल्याने आपण शेतीचे उत्पन्न गमावू शकतो. कालांतराने, परागणात त्यांची भूमिका बजावण्यासाठी मधमाश्यांशिवाय काही वनस्पती नामशेष होतील. त्यामुळे प्रदुषणांवर नियंत्रण केले पाहिजे नाही तर एक दिवस असाही येऊ शकतो की पृथ्वीवर मानवाचे अस्थित्व हे कायमचेच संपून जाईल.
जागतिक मधमाशी दिन घोषित करण्यासाठी स्लोव्हेनियन पुढाकार : 2015 मध्ये स्लोव्हेनियन मधमाशीपालन संघटनेच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेकडे (FAO) जागतिक मधमाशी दिनाच्या घोषणेसाठी ठराव सादर केला होता. त्यानंतर 7 जुलै 2017 रोजी रोम येथे झालेल्या 40 व्या अधिवेशनात संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या परिषदेने या उपक्रमाला मान्यता दिली. या प्रक्रियेला आज संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने जागतिक मधमाशी दिनाच्या ठरावाला सहमती दर्शवून मान्यता दिली आहे.
हेही वाचा : Sanya Malhotra Interview: लॉकडाऊन काळात प्रेक्षकांनी जज केल्याचा सान्या मल्होत्राला साक्षात्कार.