ETV Bharat / bharat

Womens Asia Cup 2022, INDW vs PAKW : आज भारत-पाकिस्तान महामुकाबला, जाणून घ्या, केव्हा आणि कुठे पाहता येणार सामना - Womens Asia Cup 2022

मागील सामन्यांमध्ये नवीन खेळाडूंना संधी देऊनही सहज विजयाची नोंद करणारा भारतीय संघ, शुक्रवारी पाकिस्तानविरुद्धच्या ( INDW vs PAKW ) सामन्यात विजयी मोहीम सुरू ठेवण्यासाठी मजबूत संघासह महिला आशिया कप टी-20 क्रिकेट ( Womens Asia Cup 2022 ) स्पर्धेत उतरेल.

IND vs PAK
भारत-पाकिस्तान
author img

By

Published : Oct 7, 2022, 9:40 AM IST

सिल्हेट: बांगलादेशमध्ये खेळल्या जात असलेल्या महिला आशिया चषक ( Womens Asia Cup 2022 ) स्पर्धेत आज (7 ऑक्टोबर) भारतीय महिला क्रिकेट संघ पाकिस्तानच्या महिला संघाशी ( INDW vs PAKW ) भिडणार आहे. पुरुष संघाप्रमाणेच महिला संघ देखील एकमेकांशी भिडतात तेव्हा दोघांमध्ये हाय-व्होल्टेज सामना होतो. भारत आणि पाकिस्तानच्या शेवटच्या दोन सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर मार्चमध्ये दोन्ही संघ जगभर गाजले होते. विश्वचषक आणि अलीकडेच 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकमेकांशी भिडले होते. या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे.

मागील सामन्यांमध्ये नवीन खेळाडूंना संधी देऊनही भारतीय संघाने सहज विजयाची नोंद केली. शुक्रवारी पाकिस्तानविरुद्धच्या ( Pakistan Womens Cricket Team ) सामन्यात विजयी मोहीम सुरू ठेवण्यासाठी मजबूत संघासह महिला आशिया कप टी-20 क्रिकेट ( Womens Asia Cup 2022 ) स्पर्धेत उतरेल. भारताने त्यांच्या द्वितीय श्रेणीतील खेळाडूंना संधी देण्यासाठी गेल्या दोन सामन्यांमध्ये एकूण आठ बदल केले आहेत. परंतु हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ त्यांच्या प्रमुख खेळाडूंसोबत जेतेपदाच्या दावेदार पाकिस्तानविरुद्ध खेळेल.

भारत सलग तीन सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी -

गुरुवारी थायलंडच्या कमकुवत संघाकडून पाकिस्तानला चार गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. भारताविरुद्ध ( Indian Womens Cricket Team ) मैदानात उतरण्यापूर्वी त्याच्या संघाला या अस्वस्थतेतून सावरण्याची पुरेशी संधीही मिळणार नाही. हे दोन्ही संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानांवर आहेत. भारताने सलग तीन सामने जिंकले असून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा संघ तीनपैकी दोन सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान महिला सामना कधी आणि कुठे होणार?

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि पाकिस्तान महिला संघ ( IND vs PAK ) यांच्यात आज दुपारी 1 वाजल्यापासून सिल्हेट येथील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ( Sylhet International Cricket Stadium ) सामना रंगणार आहे. सामना सुरु होण्याच्या अगोदर दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानावर उपस्थित असतील.

या सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे होणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. हा सामना Disney + Hotstar (Disney + Hotstar) अॅपवर देखील पाहता येईल.

दोन्ही संघ:

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, सबिनेनी मेघना, रिचा घोष (डब्ल्यूके), स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव आणि के.पी.नवगिरे.

पाकिस्तानः बिस्माह मारूफ (कर्णधार), आयमान अन्वर, आलिया रियाझ, आयेशा नसीम, ​​डायना बेग, कैनत इम्तियाज, मुनिबा अली, निदा दार, ओमैमा सोहेल, सदफ शमास, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज आणि तुबा हसन.

हेही वाचा - IND vs SA 1st ODI : पहिल्याच सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून 9 धावांनी पराभव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.