ETV Bharat / bharat

Women Reservation Bill : दोन्ही सभागृहात महिला आरक्षण विधेयक मंजूर; पंतप्रधान मोदींनी महिला खासदारांसोबत साजरा केला आनंद

Women Reservation Bill : संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलय. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल. हे विधेयक काल राज्यसभेत मंजूर झालं. यापूर्वी महिला आरक्षण विधेयक लोकसभेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं होतं.

Women Reservation Bill
महिला आरक्षण विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी महिला खासदारांसोबत साजरा केला आनंद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2023, 12:17 PM IST

महिला आरक्षण विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी महिला खासदारांसोबत साजरा केला आनंद

नवी दिल्ली Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक काल राज्यसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. यापूर्वी हे विधेयक लोकसभेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं होतं. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. काल राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर जल्लोषाचं वातावरण होतं. हे विधेयक मंजूर झाल्यामुळं सर्व महिला खासदार खूप खूश होत्या. त्याचवेळी, जेव्हा पंतप्रधान मोदी नवीन संसदेतून बाहेर आले तेव्हा महिला खासदारांनी त्यांचं स्वागत केरत आणि घोषणाही दिल्या.

  • Prime Minister Narendra Modi met the women MPs after the passage of the Nari Shakti Vandan Adhiniyam.

    "It is gladdening to see the torchbearers of change come together to celebrate the very legislation they have championed. With the passage of the Nari Shakti Vandan Adhiniyam,… pic.twitter.com/MZyIWt5nui

    — ANI (@ANI) September 21, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संसदीय लोकशाहीचा सुवर्णक्षण : महिला खासदारांनी नवीन संसदेच्या बाहेर पंतप्रधान मोदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सर्व महिला खासदार मोदी-मोदीच्या घोषणा देत होत्या. त्याचवेळी काही महिला खासदार मिठाई घेऊन संसदेत पोहोचल्या. यावेळी पंतप्रधानांनी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत ग्रुप फोटोसाठी पोजही दिली. या विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी सर्व खासदारांचे आभार मानले. हे विधेयक मंजूर झाल्यानं लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. तसंच हे विधेयक मंजूर करण्यात सर्व पक्षांची महत्त्वाची भूमिका असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर हा संसदीय लोकशाहीचा सुवर्ण क्षण असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय.

महिला खासदारांची जोरदार घोषणाबाजी : महिला आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यावर महिला खासदारांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यावेळी सर्वांनी एकमेकांना मिठाई खाऊ घातली. महिला खासदारांनी भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. यासोबतच 'मोदी है तो मुमकिन है' अशा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी नव्या संसदेत अनेक अभिनेत्रीही दिसल्या. यात तमन्ना भाटिया, दिव्या दत्ता, खुशबू, इशिता भट्ट, कंगना रणौतसह अनेक अभिनेत्रींनी सहभाग घेतला होता. नारी शक्ती वंदन कायदा मंजूर झाल्याबद्दल, पीएम मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट केलीय. आपला देश बदलासह पुढे जात आहे हे पाहून मला खूप आनंद होत आहे. नारी शक्ती वंदन कायदा मंजूर झाल्यामुळे आपला देश उज्वल आणि सर्वसमावेशक भविष्याच्या उंबरठ्यावर उभा असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय.

दिल्लीतील भाजप कार्यालयात पंतप्रधान मोदींचे स्वागत : महिला आरक्षण विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज राष्ट्रीय राजधानीतील भाजप मुख्यालयात जंगी स्वागत करण्यात आलं. आज मी देशातील सर्व महिलांचे अभिनंदन करतो. काल आणि परवा एक नवा इतिहास घडताना दिसला. तो इतिहास घडवण्याची संधी करोडो लोकांनी आम्हाला दिली हे आमचे भाग्य असल्याचं यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले. या महिला आरक्षण विधेयकाच्या मार्गात अनेक अडथळे आहेत. पण जेव्हा हेतू चांगला असतो आणि प्रयत्नांमध्ये पारदर्शकता असते तेव्हा सर्व अडथळ्यांवर मात करून परिणाम दिसून येतात. हा स्वतःच एक विक्रम आहे. या विधेयकाला संसदेत मोठा पाठिंबा मिळाला. त्याबद्दल मी सर्व राजकीय पक्ष आणि खासदारांचे आभार मानतो, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

हेही वाचा :

  1. Parliament Special Session : संसदेच्या विशेष सत्राचं सूप वाजलं; महिला आरक्षण विधेयक मंजुरीनंतर दोन्ही सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित
  2. Parliament Special Session 2023 : लोकसभेत दोन तृतीयांश मतांनी महिला आरक्षण विधेयक मंजूर, जाणून घ्या प्रतिक्रिया
  3. Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकाला 'या' पक्षांचा आहे विरोध, जाणून घ्या कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.