ETV Bharat / bharat

Women Fitness: पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये व्यायामाचे प्रमाण कमी; जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल - Know the importance of exercise for women

जागतिक आरोग्य संघटनेच्या ( National Health Survey )अहवालानुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये शारीरिक हालचालीचे, व्यायामाचे प्रमाण कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.( Women Also Need To Exercise For Fitness The Amount Of Exercise Among Women Is less Than That Of Men )

For Fitness  Women Need To Exercise
महिलांनी फिटनेससाठी व्यायाम करणेही गरजेचे
author img

By

Published : Sep 14, 2022, 5:11 PM IST

तुम्ही घरी स्वयंपाक करत असाल, लादी पुसणे, कचरा काढत असाल, मुलांना सांभाळत असाल आणि हे सगळं केल्यावर ऑफिसलाही जात असाल तर तुम्ही स्वत:ला अक्टिव्ह वुमन म्हणून घेऊ शकता पण प्रत्यक्षात तसे असेलच असे नाही. अनेक स्त्रिया व्यायाम न करण्याची सबब, आम्ही घरातली कामे करतो अशी देतात. ही कामे उरकतानाच इतके थकायला होते की वेगळा व्यायाम करण्याची गरजच राहत नाही. मात्र असा विचार करणेच आजारांना निमंत्रण देणारे आहे. घरची कामे म्हणजेच व्यायाम अशी स्त्रियांची समजूत असते. ( Women Also Need To Exercise For Fitness The Amount Of Exercise Among Women Is less Than That Of Men )

शारीरिकदृष्ट्या अ‌ॅक्टिव्ह म्हणजे नक्की काय? - राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार, ( National Health Survey ) शारीरिक हालचाल म्हणजे ज्यात संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर वेगवान चालणे, वॉटर एरोबिक्स, सायकल चालवणे, टेनिस खेळणे हे सगळे शारीरिक हालचालींमध्ये मोडते.

  1. घरातली कामे म्हणजे शारीरिकदृष्ट्या हालचाल असलेला व्यायाम नव्हे.
  2. प्रौढ व्यक्तीने आठवड्यातून किमान दीडशे मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे.
  3. एरोबिक्स व्यायामुळे हृद्याचे ठोके वाढतात. श्वास वर-खाली होतो, शरीरात उष्णता निर्माण होते.
  4. शॉपिंग, स्वयंपाक करणे, घरातली छोटी-मोठी कामे करणे म्हणजे शारीरिकदृष्ट्या सक्रिय होत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे फायदा होत नाही असे नाही. या कामांमुळे शारीरिक हालचालींचे स्वरुप बदलते.

शारीरिकदृष्ट्या कमी सक्रिय महिला - जागतिक आरोग्य संघटनेच्या ( World Health Organization ) अहवालानुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये शारीरिक हालचालीचे, व्यायामाचे प्रमाण कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वसाधारणपणे महिला पुरुषांपेक्षा जास्त सक्रिय असतात असा समज आहे. या निष्कर्षासाठी काही कारणे आहेत. घरात मुलांना सांभाळण्याची जबाबदारी सर्वसाधारणपणे स्त्रियाच सांभाळतात. यामध्ये त्यांचा बहुतांश वेळ जातो. स्त्रियांनी व्यायामासाठी तसंच स्वत:ला फिट ठेवण्यासाठी वेळ देण्यासारखी सामाजिक मोकळीक आपल्याकडे नाही. त्यामुळे स्त्रिया शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहण्यात मागे राहतात.

कमी व्यायामाचे धोके - शरीराची हालचाल कमी झाल्याने काय धोके निर्माण होतात याचा उल्लेख जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात करण्यात आला आहे. जीवनशैलीशी निगडीत हा आजार आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर पुढे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

- हृद्याशी निगडीत विकार

- डायबेटिस ( Diabetes )

- लठ्ठपणा ( obesity )

- रक्तदाब ( Blood pressure )

- कोलेस्टेरॉलची समस्या (Cholesterol )

काम करूनही महिला हालचालींमध्ये पिछाडीवर का? - भारतीय महिलांना स्वत:साठी वेळ काढणे खूप कठीण असते. अशावेळी थोडे चतुराईने काम करायला हवे. एखादी बाई भाजी खरेदी करायला जात असेल तर तिने चालत जावे. वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्याचे काम करत असेल तर बाजूला एक स्टूल ठेवावं. ज्यावर चढावे-उतरावे, जेणेकरून थोडा व्यायाम होईल. शहरांमध्ये बहुतांशी कामे यंत्रांच्या माध्यमातूनच होतात. यंत्रांवरचं अवलंबित्व कमी करायला हवे. कणीक मळणं हा उत्तम शारीरिक व्यायाम आहे. मात्र आता सगळ्या गोष्टी यंत्र करत असल्याने आपणच फिट ठेऊ शकतील, अशा गोष्टी कमी करत चाललो आहोत, हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवण्यासारखा आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल - अनेक देशातल्या माणसांची आरोग्य पाहणी करण्यात आली. चारपैकी एक प्रौढ व्यक्ती हवी तेवढे सक्रिय नसल्याचे हा अहवाल सांगतो. काही देशांमध्ये तीनपैकी एक व्यक्ती सक्रिय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया कमी अक्टिव्ह अर्थात सक्रिय असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. विकसित सधन देशांच्या तुलनेत विकसनशील आणि आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर असलेल्या देशातली माणसे अधिक सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. शारीरिक हालचाल कमी असणाऱ्या माणसांना हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता अधिक असते. डायबेटिस होण्याचे प्रमाणही जास्त असतं. काहींना शारीरिक हालचालींच्या अभावी कॅन्सरही होण्याची शक्यता असते. शारीरिक हालचाली, व्यायामाचा अभाव असेल तर माणसाच्या मेंदूवरही परिणाम होण्याची शक्यता असते. भारतातल्या 43 टक्के महिला शारीरिकदृष्ट्या कमी हालचाल असणाऱ्या आहेत. देशातल्या पुरुषांमध्ये हे प्रमाण 23.5 टक्के आहे. शारीरिकदृष्ट्या सगळ्यात निष्क्रिय होण्याची नामुष्की कुवेतवर ओढवली आहे. शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणाऱ्यांचे सर्वाधिक प्रमाण युगांडात सगळ्यांत जास्त आहे. हा अहवाल म्हणजे 168 देशांपैकी घेण्यात आलेल्या 358 सर्वेक्षणांचं निष्कर्ष आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.