ETV Bharat / bharat

लुडोच्या खेळात महिलेने चक्क स्वत:लाच पणाला लावले! - भगवा जकात नाका पोलिसांकडे तक्रार

पतीने याबाबत भगवा जकात नाका पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे सांगितले होते, मात्र अद्याप काहीही झाले नाही. (Ludo in Pratapgarh).

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 4, 2022, 10:32 PM IST

प्रतापगढ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यात एका महिलेने घरमालकासोबत लुडो खेळत असताना स्वत:लाच पणाला लावले! हा प्रकार महिलेच्या पतीला कळताच त्याने पोलिसात धाव घेतली. (woman put herself at stake in Ludo).

पोलिसांकडून अद्याप कारवाई नाही : ही महिला प्रतापगड परिसरात भाड्याच्या खोलीत राहते. महिलेचा नवरा राजस्थानमध्ये वीटभट्टीवर काम करतो. नवऱ्याच्या म्हणण्यानुसार तो पत्नीच्या खात्यावर पैसे पाठवतो. एके दिवशी त्याने फोनवर घरी येण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा महिलेने त्याला सांगितले की, ती घरमालकाशी लुडो खेळताना स्वत:ला हरवून बसली आहे. तुम्ही जर इथे आलात तर तुम्हाला कुऱ्हाडीने कापून फेकून देण्यात येईन. पतीने सांगितल्यानुसार, त्याने याबाबत भगवा जकात नाका पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे सांगितले होते, मात्र अद्याप काहीही झाले नाही.

पत्नी जुगार खेळण्याची शौकीन : महिलेच्या पतीच्या म्हणण्यानुसार तिला दोन लहान मुले आहेत. त्याचबरोबर घरमालकाला देखील दोन मुले आहेत. पत्नी जुगार खेळण्याची शौकीन असल्याचे पतीचे म्हणणे आहे. यासंदर्भात सीओ सिटी सुबोध गौतम यांचे म्हणणे आहे की, तक्रार अद्याप नोंदल्या गेलेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यानंतरच या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.