ETV Bharat / bharat

Online Fraud In Hyderabad : सोशल माध्यमावरील साडीच्या मोहापायी गमावले लाखो रुपये, हैदराबादच्या महिलेची फसवणूक, अशी घ्या काळजी - सायबर फसवणूक

सध्या सोशल माध्यमांवर आकर्षक जाहिरातींचा सुळसुळाट झाला आहे. या आकर्षक जाहिरातीला बळी पडून नागरिक संबंधित वस्तू मागवतात. मात्र याद्वारे फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार पुढे आले आहेत. नुकतीच हैदराबादच्या महिलेची ऑनलाईन साडी खरेदी करताना फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

Online Fraud In Hyderabad
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Feb 14, 2023, 8:42 PM IST

हैदराबाद : सोशल माध्यमावरील साडीच्या मोहापायी महिलेने लाखो रुपये गमावल्याने खळबळ उडाली. ही घटना हैदराबादमधील एलबी नगर परिसरात उघडकीस आली. सोशल माध्यमावर आवडलेली साडी या महिलेने ऑर्डर केली होती. याप्रकरणी पीडित महिलेने एलबी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या बँक खात्यावर सायबर फसवणूक करणाऱ्या भामट्यांची नजर असल्याचे त्यावरुन दिसून आले. नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सोशल माध्यमावर पाहिली होती साडी : एलबी नगर परिसरातील महिलेने सोशल माध्यमावर एक आकर्षीत साडी पाहिली होती. त्यामुळे महिलेने ही साडी ऑर्डर केली. ऑर्डर करताना महिलेने साडी कॅश ऑन डिलीव्हरी ऑर्डर केली होती. मात्र आलेली साडी आणि सोशल माध्यमावर असलेल्या जाहिरातीतील साडी यात खूप फरक होता. त्यातही मागवलेली साडी ही डॅमेज होती. त्यामुळे महिलने तात्काळ याबाबत डिलिव्हरी बॉयकडे याबाबत तक्रार केली. मात्र डिलिव्हरी बॉयने महिलेकडे ऑनलाईन तक्रार करायला सांगितले.

पैसे खात्यात जमा होण्यासाठी दिली लिंक : साडी फाटलेली असल्याने महिलेने याबाबत ऑनलाईन तक्रार दाखल केली. त्यानंतर या महिलेने कॉलसेंटरकडे याबाबत तक्रार केली. कॉलसेंटरवरील बोलणाऱ्या महिलेने पैसे जमा होण्यासाठी या महिलेला एक लिंक पाठवली होती. आपल्या साडीचे दिलेले पैसे परत मिळतील या आशेने पीडित महिलेने कॉलसेंटरवरील व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर महिलेने या लिंकला क्लिक करुन आपली माहिती भरली.

पैसे जमा होण्याऐवजी लागला चुना : सोशल माध्यमावर पाहिलेल्या साडीच्या मोहाने महिलेने साडी ऑर्डर केली होती. मात्र फाटकी साडी आल्याने तिने पैसे परत मिळावे म्हणून तक्रार दाखल केली. महिलेला कॉल सेंटरवरील व्यक्तीने पाठवलेल्या लिंकवर सगळी माहिती आणि बँकेचे डिटेल्स भरायला सांगितले. आपले पैसे लवकरच आपल्या खात्यात जमा होतील, या भाबड्या आशेपायी या महिलेने त्या लिंकवर सगळी माहिती भरली. त्यानंतर पीडित महिलेला एक पासवर्ड आला, सदर पासवर्ड त्या महिलेने त्या लिंकमध्ये टाकला. त्यामुळे महिलेच्या खात्यात पैसे जमा होण्याऐवजी कट झाले. थोड्या वेळात महिलेने ऑनलाईन पैसे जमा झाले की नाही, याबाबतची खात्री केली. मात्र ऑनलाईन स्टेटस चेक केल्यानंतर महिलेला धक्काच बसला. त्या महिलेच्या खात्यात पैसे जमा होण्याऐवजी ते कट झाल्याचे दिसून आले.

महिलेने पोलीस ठाण्यात घेतली धाव : आपल्या साडीचे पैसे परत मिळण्याऐवजी खात्यातील पैसे वळते झाल्याने महिलेच्या पायाखालची मातीच सरकली. पीडित महिलेने पोलीस ठाणे गाठत आपली आपबिती कथन केली. सोशल माध्यमावर दिसणाऱ्या आकर्षक साड्यांच्या जाहिरातील बळी पडून महिलेने आपल्या खात्यातील पैसे गमावले. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बेसावधपणे लिंकला क्लिक केले आणि . . . : सोशल माध्यमावर अनेक प्रकारच्या आकर्षक जाहिराती पाहण्यास मिळतात. त्यामुळे अनेकजण या जाहिराती पाहुन साहित्य खरेदी करण्याचा मोह धरतात. मात्र यातील सगळ्याच जाहिराती खऱ्या असत नाहीत. त्यामुळे कोणतीही आकर्षक जाहिरातीवर क्लिक करण्यापूर्वी एकदा त्याबाबतची खातरजमा करायला हवी. सोशल माध्यमावर कमी किमतीत चांगल्या वस्तू खरेदी करण्याच्या अनेक फसव्या जाहिराती पेरण्यात येतात. या माध्यमातून कमी किमतीत नागरिकांना चांगल्या वस्ती देण्याचे आमिष देण्यात येते. ही वस्तू मागवल्यानंतर ती निकृष्ठ दर्जाची असते. त्यानंतर पैसे परत करण्याच्या नावाने फसवेगिरी करुन बँक अकाऊंट हॅक करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वेळीस सावध होण्याचे आवाहन ईटीव्ही भारतच्या वतीने करण्यात येत आहे.

छोटी चूक मोठा तोटा : सोशल माध्यमांवर अनेक फसव्या कंपन्यांच्या जाहिराती करण्यात येत आहेत. त्यामाध्यमातून बँक अकाऊंट हॅक होण्याचे प्रमाण वाढले आहे. आपली एक छोटीसी चूकही मोठी धोकादायक ठरू शकते. सध्या ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. सायबर गुन्हेगार आपली माहिती हॅक करुन ती काढू शकतात. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण होते. याबाबत आपल्या खात्याचा पासवर्ड कोणालाही देऊ नये, ओटीपी कोणासोबतही शेअर करु नये, असे आवाहन सायबर इंटेलिजन्सचे संचालक प्रसाद पतीबंधला यांनी केले आहे.

हेही वाचा - Delhi Crime : दिल्लीत श्रद्धा खून प्रकरणाची पुनरावृत्ती; लग्नास विरोध करणाऱ्या प्रेयसीचा खून करुन नराधमाने मृतदेह ठेवला फ्रिजमध्ये

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.