वाराणसी - जिल्ह्यात बुधवारी एका महिलेने एका विचित्र मुलाला जन्म दिला. वाराणसीच्या चिरागांव प्राथमिक आरोग्य केंद्रात एका महिलेने आठ तोंड, आठ नाक आणि आठ डोळे असलेल्या बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. आरोग्य केंद्रात अशा विचित्र मुलाचा जन्म झाल्याची बातमी ऐकताच त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली. तथापि, जन्माच्या सुमारे 20 मिनिटांनंतर मुलाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, फुलपूर येथे राहणारी सुमन देवी मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास चिरागांव प्राथमिक आरोग्य केंद्रावर प्रसुती वेदना झाल्याने दाखल झाल्या. बुधवारी सकाळी 8.20 वाजता सुमनने यांनी बाळाला जन्म दिला. या मुलाला आठ तोंड, डोळे आणि नाक होते. मुलाचे असे विचित्र रूप पाहून रुग्णालयातील डॉक्टरदेखील आश्चर्यचकित झाले. तर मुलाचे वजन सुमारे चार किलो होते, असे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी अमित सिंह यांनी सांगितले.
गुणसूत्रांमधील अडचणीमुळे अशा बाळाचा जन्म...
अशी मुले केवळ गुणसूत्रांमधील अडचणीमुळे उद्भवतात, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. अशोक राय यांनी सांगितले. हे बाळ वैद्यकीय क्षेत्रात एक अद्भूत चमत्कार मानलं जात आहे. यापूर्वीही दोन तोंड असलेल्या बाळाचा जन्म झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा प्रकारचे बाळ चार-पाच दिवस जिवंत राहत असल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे. स्त्रीला गर्भधारणेपासून तर प्रसुतीपर्यंत 3 ते 4 वेळा सोनाग्राफी करणे गरजेचे आहे. सोनोग्राफीमुळे बाळाची माहिती मिळते. बाळामध्ये काही व्यंग आढळल्यास तसेच या व्यंगामुळे ते जिवंत राहत नसल्यास 20 आठवड्यापर्यंत कायदयाने त्या मातेचा गर्भपात करता येतो.