सुरत (गुजरात) : मुंबईहून फालनला २१ फेब्रुवारी रोजी जाणाऱ्या सूर्यनगरी एक्स्प्रेस रेल्वेमध्ये एका महिलेची चालू रेल्वेतच प्रसूती करण्यात आली. रेल्वे प्रवास सुरु असताना या गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरु झाल्या होत्या. घटनेचे गांभीर्य ओळखता रेल्वेतील इतर प्रवाशांनी या घटनेची माहिती तात्काळ रेल्वेच्या टीटीला दिली. टीटीईने चालू रेल्वेतच महिलेला प्रसूती वेदना होत असल्याची माहिती तात्काळ सुरत रेल्वे स्थानकाच्या अधीक्षकांना कळवली.
-
ट्रेन में गूंजी किलकारी...👶🚉
— Western Railway (@WesternRly) February 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
सूर्यनगरी एक्सप्रेस में दिनांक 21.02.2023 को मुंबई से फालना सफ़र कर रही एक महिला यात्री को अचानक प्रसव पीड़ा हुई,ऑन बोर्ड टीटीई ने तुरंत इसकी सूचना सूरत स्टेशन अधीक्षक को दी तथा महिला यात्रिओं की मदद से सुरक्षित डिलीवरी कराई गयी। pic.twitter.com/1x3v0jnY3W
">ट्रेन में गूंजी किलकारी...👶🚉
— Western Railway (@WesternRly) February 22, 2023
सूर्यनगरी एक्सप्रेस में दिनांक 21.02.2023 को मुंबई से फालना सफ़र कर रही एक महिला यात्री को अचानक प्रसव पीड़ा हुई,ऑन बोर्ड टीटीई ने तुरंत इसकी सूचना सूरत स्टेशन अधीक्षक को दी तथा महिला यात्रिओं की मदद से सुरक्षित डिलीवरी कराई गयी। pic.twitter.com/1x3v0jnY3Wट्रेन में गूंजी किलकारी...👶🚉
— Western Railway (@WesternRly) February 22, 2023
सूर्यनगरी एक्सप्रेस में दिनांक 21.02.2023 को मुंबई से फालना सफ़र कर रही एक महिला यात्री को अचानक प्रसव पीड़ा हुई,ऑन बोर्ड टीटीई ने तुरंत इसकी सूचना सूरत स्टेशन अधीक्षक को दी तथा महिला यात्रिओं की मदद से सुरक्षित डिलीवरी कराई गयी। pic.twitter.com/1x3v0jnY3W
महिला प्रवाशांनी केली सुरक्षित प्रसूती: रेल्वेने प्रवास करत असलेल्या या महिलेला अचानकपणे तीव्र प्रसूती वेदना रेल्वेत सुरु झाल्या. या महिलेसोबत प्रवास करत असलेल्या इतर महिलांनी तात्काळ तिच्या प्रसूतीची तयारी सुरु केली. कारण रेल्वे स्थानक लांब असल्याने या गर्भवती महिलेला तात्काळ वैद्यकीय मदत पोहोचणे शक्यता नव्हते. त्यामुळे पुढील रेल्वे स्थानक येईपर्यंत रेल्वेच्या डब्यातच महिलेची प्रसूती करण्याचे इतर महिला प्रवाशांनी ठरवले. त्यानुसार इतर महिला प्रवाशांनी या गर्भवती महिलेची रेल्वेच्या डब्यातच सुरक्षित प्रसूती केली.
सुरतला पोहोचल्यावर रुग्णवाहिकेद्वारे नेले रुग्णालयात: रेल्वेतच महिला प्रवाशाची सुरक्षित प्रसूती झाल्यानंतर ही रेल्वे गुजरातच्या सुरत येथील रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. टीटीईने महिलेची रेल्वेमध्ये प्रसूती होण्याच्या आधीच सुरत रेल्वे स्थानकावरील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली होती. त्यामुळे सुरत रेल्वे स्थानकावर रेल्वे पोहोचण्याच्या पूर्वीच येथील अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून ठेवली होती. सुरतच्या रेल्वे स्थानकावर रेल्वे पोहोचताच रुग्णवाहिकेसोबत आलेल्या डॉक्टरांनी महिलेला तात्काळ रुग्णवाहिकेत घेऊन रुग्णालय गाठले. तेथे आई आणि बाळाला आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या.
गोंडस अशा मुलीला जन्म: रेल्वेत प्रसूत झालेल्या महिलेने यावेळी अतिशय गोंडस अशा मुलीला जन्म दिला आहे. प्रसूती झाल्यानंतर आता आई आणि छोट्या बाळाची प्रकृती व्यवस्थित आहे. दरम्यान, पनकी देवी असे या प्रसूती झालेल्या महिलेचे नाव आहे. सुरतच्या पुढच्या स्थानकावर पोहोचताच डॉक्टरांच्या पथकाने त्यांना हजेरी लावली आणि महिला आणि नवजात अर्भकाची उत्तम काळजी घेण्यासाठी त्यांना रुग्णालयात पाठवले. आई आणि नवजात बाळ आता पूर्णपणे निरोगी आहेत. रेल्वेत प्रसूती होण्याच्या वेळेस मदत करणाऱ्या महिला प्रवासी आणि प्रसूतीनंतर महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेली मदत याबद्दल महिलेच्या पतीने रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत.