ETV Bharat / bharat

धक्कादायक! जेएनयूच्या कॅम्पसमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह - जेएनयू महिला मृत्यू

जेएनयू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये महिलेचा मृत्यू आढळला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

महिलेचा मृत्यू
महिलेचा मृत्यू
author img

By

Published : Aug 26, 2021, 3:38 PM IST

नवी दिल्ली - विविध आंदोलनांनी चर्चेत येणाऱ्या दिल्लीमधील जेएनयू विद्यापीठात धक्कादायक घटना घडली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) कॅम्पसमध्ये महिलेचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला आहे. ही घटना समजताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जेएनयूमध्ये मृतदेह आढळलेल्या महिलेचा पती विद्यापीठात पीएचडी करत आहे. मृतावस्थेत आढळलेली महिला ही ब्रह्मपुत्रा होस्टेलमध्ये राहत होती. होस्टलेच्या दुसऱ्या मजल्यावरून महिलेने उडी घेतल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी वसंत कुंज नॉर्थ पोलीस तपास करीत आहेत.

हेही वाचा-काय आहे म्हैसूर सामूहिक बलात्कार प्रकरण, मुंबईच्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

10 जुनला ग्रंथालयात झाली होती तोडफोड

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांच्या एका गटावर ग्रंथालयात तोडफोड केल्याचा आणि कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. जेएनयू प्रशासनाने आरोपी विद्यार्थ्यांविरूद्ध 10 जुन 2021 रोजी गुन्हा दाखल केला आहे. विद्यापीठाच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

हेही वाचा-तालिबानींकडून हत्या नव्हे मारहाण- अफगाणिस्तानच्या पत्रकाराचा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.