ETV Bharat / bharat

Deoghar Trikut Ropeway Accident : त्रिकुट रोपवे अपघातात रेस्क्यू करताना महिलेचा खाली पडून मृत्यू

त्रिकुट रोपवेमध्ये ( Trikut Ropeway ) काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रोपवे हे हवेतच अडकले ( Deoghar Jharkhand Ropeway Accident ) आहे. मागील 20 तासांपासून देवघर त्रिकुट रोपवेमध्ये 48 पर्यटक अडकले होते. 42 प्रवाश्यांना काढण्यात प्रशासनाला यश आले. त्रिकूट डोंगरावर सुरू असलेल्या बचाव कार्यादरम्यान आजही अपघात झाला आहे. बचावादरम्यान रोपवेमध्ये दोरी अडकल्याने एक महिला खाली पडली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

Deoghar Trikut Ropeway Accident
रोपवे अपघातात रेस्क्यू करताना महिलेचा खाली पडून मृत्यू
author img

By

Published : Apr 12, 2022, 3:41 PM IST

देवघर (झारखंड) - त्रिकुट रोपवेमध्ये ( Trikut Ropeway ) काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रोपवे हे हवेतच अडकले ( Deoghar Jharkhand Ropeway Accident ) आहे. मागील 20 तासांपासून देवघर त्रिकुट रोपवेमध्ये 48 पर्यटक अडकले होते. 42 प्रवाश्यांना काढण्यात प्रशासनाला यश आले. त्रिकूट डोंगरावर सुरू असलेल्या बचाव कार्यादरम्यान आजही अपघात झाला आहे. बचावादरम्यान रोपवेमध्ये दोरी अडकल्याने एक महिला खाली पडली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सोमवारीही बचावकार्य करताना सेफ्टी बेल्ट उघडल्यानंतर एक व्यक्ती खाली पडली होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता.

त्रिकुट रोपवे अपघातात रेस्क्यू करताना महिलेचा खाली पडून मृत्यू

देवघर येथील त्रिकूट रोपवे दुर्घटनेबाबत मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मात्र सोमवारी दुपारी बचावकार्य सुरू असताना एक वेदनादायक अपघात समोर आला. लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे रोपवेवरून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. यादरम्यान एका व्यक्तीला दोरीच्या साहाय्याने रोपवेमधून बाहेर काढण्यात आले. त्याला दोरीने बांधून हेलिकॉप्टरमध्ये आणण्यात आले. त्या व्यक्तीने हेलिकॉप्टर गाठले आणि त्यात चढण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र यादरम्यान त्याचा हात हेलिकॉप्टरमधून सुटला आणि तो खाली पडला. या अपघातानंतर जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

रविवारी घडली घटना - देवघरच्या त्रिकुट डोंगरात रविवारी रोप वेच्या अनेक ट्रॉली एकमेकांवर आदळल्या. दोन-तीन ट्रॉलींच्या धडकेने वरील ट्रॉलीही पुढे जाऊ लागल्या. त्यामुळे ते दगडांवरही आदळले, त्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर रोपवेचे काम थांबले, लोक हवेत डोलत राहिले. रोपवे ट्रॉली एकमेकांवर आदळल्याने सुमारे अर्धा डझन लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. रामनवमीनिमित्त शेकडो पर्यटक याठिकाणी पूजा करण्यासाठी आणि भटकंती करण्यासाठी आले होते.

हेही वाचा - Trikut Pahar Ropeway Accident : त्रिकूट डोंगरावर रोपवेमध्ये बचावकार्य सुरूच; हेलिकॉप्टरमधून पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.