अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणूक 2022 मध्ये ( Gujarat assembly elections 2022 ) आम आदमी पार्टी जोरदार ( Aam Aadmi Party ) प्रचार करत आहे. आम आदमी पक्षाला गुजरातमध्ये जागा जिंकने म्हत्वाचे आहे. आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळवण्यासाठी गुजरातची निवडणुक महत्वाची मानली जात आहे. 2024 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे भवितव्य या निवडणुकीतून आम आदमी पक्षाचे ठरणार आहे.
दिल्लीच्या नेत्यांनी तीन महिने केला प्रचार - गेल्या तीन महिन्यांपासून, दिल्लीतील नेत्यांनी गुजरातची जागा जिंकण्यासाठी आम आदमी पार्टीचा जोरदार प्रचार केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया गुजरात राज्याचे प्रभारी असलेले खासदार राघव चढ्ढा हे सर्व गुजरातमध्येच आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर आम आदमी पार्टी राष्ट्रीय पक्ष बनणार का? याचे उत्तर येणारा काळच देईल.
6 टक्के मत मिळणे आवश्यक - राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी, आम आदमी पक्षाला स्थानिक विधानसभा निवडणुकीत 6 टक्के मते मिळणे आवश्यक आहे. सार्वत्रिक निवडणुकीत लोकसभेच्या चार किंवा अधिक जागा त्यांना मिळवणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीत 2% मते मिळाल्यानंतर प्रादेशिक पक्ष म्हणूनही चार राज्यांतील निवडणुकीत त्यांनी उतरायला हवे होते. वरील बाबींची पुर्ताता केल्यास आम आदमी पक्षाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त होऊ शकतो.
दिल्लीत शानदार विजय - 2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 70 पैकी 28 जागा जिंकल्या होत्या. 2015 मध्ये 70 पैकी 67 जागा, 2020 मध्ये 70 पैकी 62 जागावर पक्षाला विजय मिळाला होता. 2017 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत, आम आदमी पक्षाने 117 जागांपैकी 20 जागा जिंकल्या होत्या. तर 2022 मध्ये 117 पैकी 92 जागा जिंकून पंजाबात सरकार स्थापन केले आहे.
लोकसभेत केला प्रवेश - 2014 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या कामगिरीचे परीक्षण केले, तर 432 जागांपैकी 4 जागा आम आदमी पक्षाला मिळाल्या होत्या. दिल्ली, पंजाबपाठोपाठ, आम आदमी पार्टी सध्या गुजरात, हिमाचल प्रदेशमध्ये आपले बळ आजमवत आहे . यावरून चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी पक्ष तयार असल्याचे संकेत मिळत आहेत. आम आदमी पार्टी विधानसभा निवडणुकीत 6 टक्के मते मिळाल्यास राष्ट्रीय दर्जा प्राप्त होवू शकतो. ज्येष्ठ पत्रकार हरेश झाला यांच्या मते, गुजरात विधानसभा निवडणुकीत ६% मते मिळवणे अशक्य आम आदमी पक्षासाठी अव्हान असणार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान आम आदमीने सर्वकाही मोफत देण्याच्या नावाखाली चुकीची माहिती पसरवली आहे.
दरम्यान, 1990 मध्ये चिमन पटेल यांच्या नेतृत्वाखालील जनता दलाने 147 जागांवर निवडणूक लढवून 29 टक्के मते मिळवली होती, असे हरेश झाला यांनी पुढे सांगितले. 1995 मध्ये चिमण पटेल यांच्या निधनानंतर त्यांनी 115 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यांना केवळ 2.82 टक्के मते मिळाली होती. मताची टक्केवारी मिळवणे किती आव्हानात्मक आहे हे या उदाहरणावरून दिसून येते.