ETV Bharat / bharat

Draupadi Murmu Profile : संघर्षमय होते द्रौपदी मुर्मूंचे आयुष्य, जाणून घ्या जीवनप्रवास

18 जुलैला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडली आहे. यात मुर्मू ( NDA president candidate Draupadi Murmu ) यांचे पारडे जड असल्याची चर्चा आहे. विजय झाल्यास मुर्मू ( Draupadi murmu news ) या देशातील पहिल्या आदिवसी राष्ट्रपती होणार आहेत. राष्ट्रपतीपदासाठी अनेक उमेदवारांची नावे चर्चेत होती. मात्र, भाजपने द्रोपदी मुर्मू यांनाच निवडले. कोण आहेत द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत आज आपण जाणून घेऊया.

NDA president candidate draupadi murmu
द्रोपदी मुर्मू राष्ट्रपती उमेदवार
author img

By

Published : Jul 21, 2022, 1:43 PM IST

Updated : Jul 21, 2022, 3:33 PM IST

नवी दिल्ली - राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून ( NDA president candidate Draupadi Murmu ) झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली. मुर्मू यांच्या विरोधात विरोधी पक्षांकडून माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना उभे केले आहे. 18 जुलैला या पदासाठी निवडणूक पार पडली आहे. यात मुर्मू ( Draupadi Murmu NDA candidate ) यांचे पारडे जड असल्याची चर्चा आहे. विजय झाल्यास मुर्मू ( Draupadi murmu news ) या देशातील पहिल्या आदिवसी राष्ट्रपती होणार आहेत. राष्ट्रपतीपदासाठी अनेक उमेदवारांची नावे चर्चेत होती. मात्र, भाजपने द्रोपदी मुर्मू यांनाच निवडले. कोण आहेत द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत आज आपण जाणून घेऊया.

हेही वाचा - Fire on INS Vikramaditya : आयएनएस विक्रमादित्यला लागली आग, कुठलीही जीवितहानी नाही

अध्यक्षपदासाठी भाजपने यावेळी आदिवासी चेहऱ्यावर डाव खेळला आहे. गेल्या वेळी भाजपने राष्ट्रपतीपदासाठी दलित चेहरा पुढे केला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेशातील कानपूरचे रहिवासी होते. आणि 2017 मध्ये, एनडीएकडून उमेदवार बनण्यापूर्वी ते बिहारच्या राज्यपालपदावर होते. अशा स्थितीत दलितांपाठोपाठ आता आदिवासींकडेही भाजपने मोर्चा वळवला आहे. द्रौपदी मुर्मू संथाल कुटुंबातील आहेत. त्या मूळच्या ओडिशाच्या आहेत. (2000 ते 2004) या काळात त्या ओडिशाच्या आमदारही होत्या.

कोण आहेत द्रोपदी मुर्मू?

  • द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या नवव्या राज्यपाल होत्या. पाच वर्षांची टर्म पूर्ण करणाऱ्या पहिल्या राज्यपाल ठरल्या.
  • झारखंडची स्थापना 2000 साली झाली. त्यानंतर 2015 ते 21 दरम्यान मुर्मू या राज्यपाल होत्या.
  • द्रौपदी मुर्मू या मुळच्या ओडिशा राज्याच्या आहेत आणि त्या आदिवासी समाजातून येतात.
  • ओडिशात त्या भाजपा - बिजू जनता दल युती सरकारमध्ये मंत्री होत्या.
  • 2000 ते 2004 दरम्यान त्या रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार होत्या.
  • विशेष म्हणजे, द्रौपदी मुर्मू यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र दुखाने भरलेले आहे. मुर्मू यांच्या पतीचे निधन झालेले आहे. एवढेच नाही तर, त्यांच्या दोन मुलांचाही मृत्यू झाला आहे. सध्या त्यांच्या कुटुंबात त्यांची एकुलती एक मुलगी आहे.

द्रौपदी मुर्मू यांची राजकीय कारकिर्द - 1997 मध्ये मुर्मू या रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होता. भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या उपाध्यक्षा म्हणून त्यांनी काम पाहिले. 2000 मध्ये त्या रायरंगपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. ओडिशातील बीजेडी आणि भाजप युती सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक मंत्रालय सांभाळले. त्यानंतर 2000 ते 2004 दरम्यान मत्स्य व्यवसाय आणि प्राणी संसाधन खात्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. 2015 मध्ये, मुर्मू यांनी झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती.

निव़डणुकीत 99 टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदान केले : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 776 खासदार आणि 4,033 निवडून आलेल्या आमदारांसह एकूण 4,809 मतदार मतदानासाठी पात्र होते. नामनिर्देशित खासदार आणि आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य यामध्ये मतदान करू शकत नाहीत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, सोमवारी झालेल्या मतदानादरम्यान 99 टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदान केले. भारतीय जनता पक्षाचे खासदार सनी देओल आणि संजय धोत्रे यांच्यासह आठ खासदारांना मतदान करता आले नाही. मतदानादरम्यान देओल उपचारासाठी परदेशात गेले होते, तर धोत्रे आयसीयूमध्ये दाखल आहेत.

इतक्या आमदारांनी मतदान केले नाही : सोमवारी भाजप, शिवसेना, बहुजन समाज पक्ष, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि एआयएमआयएमच्या प्रत्येकी दोन आमदारांनी मतदान केले नाही. कोविंद यांनी 2017 मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक एकूण 10,69,358 पैकी 7,02,044 मते मिळवून जिंकली होती. त्यांच्या प्रतिस्पर्धी मीरा कुमार यांना केवळ 3,67,314 मते मिळाली होती.

हेही वाचा - Sonia Gandhi ED inquiry : सोनिया गांधींच्या ईडी चौकशीवरून संसदेत गदारोळ, कायद्यापुढे सर्व सारखे आहेत की नाही? केंद्रीय मंत्र्याचा सवाल

Last Updated : Jul 21, 2022, 3:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.