ETV Bharat / bharat

साडेसहाव्या वर्षी घर सोडलं, आता राजस्थानमध्ये भाजपासाठी गेमचेंजर! जाणून घ्या कोण आहेत बाबा बालकनाथ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 3:58 PM IST

Baba Balak Nath : लोकसभेचे विद्यमान खासदार बाबा बालकनाथ हे राजस्थानचे पुढील मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहेत. बालकनाथ शेतकरी कुटुंबात वाढले. ते सध्या बाबा मशनाथ मठाचे प्रमुख आहेत.

Baba Balak Nath
Baba Balak Nath

जयपूर (राजस्थान) Baba Balak Nath : राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ताबदल होतो. हा ट्रेंड या निवडणुकीतही कायम राहिलाय. अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचा राज्यात पराभव झाला असून, भारतीय जनता पार्टीनं दणदणीत विजय मिळवला आहे.

बाबा बालक नाथ मुख्यमंत्री होणार का : राजस्थानमध्ये भाजपाच्या विजयानंतर एक नाव आता चर्चेत येत आहे, ते म्हणजे बाबा बालक नाथ यांचं. तरुण आणि फायरब्रँड नेते बाबा बालक नाथ हे अलवर मतदारसंघातून विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र सिंह यांचा पराभव केला होता. यावेळी भाजपा नेतृत्वानं पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना तिजारा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. तेथे त्यांनी काँग्रेसचे उमेदवार इम्रान खान यांचा पराभव केला आहे. आता राज्यातील भाजपाच्या विजयानंतर ते राजस्थानचे मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

साडेसहाव्या वर्षी त्यांनी घर सोडलंं : बाबा बालक नाथ मूळ अलवरचे. जिल्ह्यातील कोहराना या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सुभाष यादव हे बाबा खेनाथ यांचे अनुयायी होते. त्यांच्यामुळे बाबा बालक नाथ यांना लहानपणापासूनच भक्ती आणि अध्यात्माची आवड लागली. वयाच्या साडेसहाव्या वर्षी त्यांनी घर सोडलं आणि एका आश्रमात आश्रय घेतला. कालांतरानं, त्यांचे गुरू महंत चांदनाथ यांच्या मदतीनं त्यांनी राजकारणात प्रवेश केला. महंत चांदनाथ हे अलवर मतदारसंघातून लोकसभेचे माजी सदस्य होते.

बाबा मशनाथ मठाचे प्रमुख आहेत : बाबा बालक नाथ हे सध्या रोहतकस्थित बाबा मशनाथ विद्यापीठाचे कुलपती आहेत. याशिवाय ते हरियाणातील बाबा मशनाथ मठाचेही प्रमुख आहेत. २०१६ मध्ये त्यांच्या आध्यात्मिक कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट आला. त्यांची नाथ संप्रदायातील सर्वात मोठा मठ, अस्थल बोहरचे आठवे मठाधिपती म्हणून नियुक्ती करण्यात आली. बालक नाथ मूळ तिजारा मतदारसंघातील नसले तरी या निवडणुकीत त्यांनी जोरदार प्रचार केला. आता त्यांच्या राजकीय प्रवासात नवा अध्याय जोडला जाईल का? उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे भाजपा हाय कमांड एका संन्यासीला मुख्यमंत्रीपदी बसवेल का? हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

हेही वाचा :

  1. "देशात भारत-जोडो, परदेशात जाऊन भारत-तोडो, जनतेनं चांगलाच धडा शिकवला", मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींची खेचली
  2. Election Results २०२३ Live Updates : पनौती शब्द भाजपासाठी लखलाभ, जनतेचा निर्णय आम्हाला मान्य - नाना पटोले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.